Join us

'तुझा अॅटिट्यूड तुला सोडावा लागेल'; विजय वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 15:45 IST

Kareena kapoor: 'जाने जान' या सिनेमात करीना आणि विजय वर्मा एकत्र स्क्रीन शेअ करणार आहेत.

उत्तम अभिनयासह कायम फिटनेसमुळे चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. आजवरच्या कारकिर्दीत करीनाने अनेक हिट सिनेमा दिले आहेत. त्यानंतर आता लवकरच ती ओटीटीवर पदार्पण करणारा असून तिचा 'जाने जान' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. त्यामुळे करीना सातत्याने चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात काम करण्यापूर्वी सैफ अली खान याने तिला एक सल्ला दिला होता.याविषयी तिने अलिकडेच एका कार्यक्रमात भाष्य केलं.सुजॉय घोष दिग्दर्शित या सिनेमात करीनासोबत अभिनेता विजय वर्मा आणि जयदीप अहलावत हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे या दोघांसोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला एक इशारा दिला होता. 'मेकअप करण्यापेक्षा अभिनयाकडे लक्ष दे', असं सैफने तिला सांगितलं होतं.

"मी २३ वर्षांपूर्वी रेफ्युजी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, त्यावेळी मी जितकी नर्व्हस नव्हते त्याच्यापेक्षा जास्त आज आहे. विजय वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने मला एक सल्ला दिला होता. ज्यामुळे मला हा नर्व्हसनेस आला", असं करीना म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन मेकअप करुन थेट सेटवर जाऊन डायलॉग्स बोलायचे हा तुझा अॅटिट्यूड तुला या सिनेमासाठी सोडावा लागेल. मी त्या दोघांना काम करताना पाहिलंय. विजय वर्मा आणि जयदीप यांच्यासोबत काम करताना तुला भूमिकेसाठी मेहनत करावी लागेल. कारण ते दोघं कायम इम्प्रोवाइज करत राहतात."

दरम्यान, करीनाने हा किस्सा सांगितल्यानंतर विजय वर्माने मस्करीमध्ये सैफ अली खानचे आभार मानले. जर ते नसते तर आम्हाला कोणी ओळखलं नसतं, असं विजय वर्मा म्हणाला. विजय, जयदीप आणि करीना यांची मुख्य भूमिका असलेला जाने जान हा सिनेमा २१ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान सेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड