Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सलमान खानने लग्न केलं तरच मी लग्न करेन'; विजय वर्माचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:35 IST

Vijay verma: अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर पहिल्यांदाच विजयने लग्नाविषयी भाष्य केलं आहे.

सध्या कलाविश्वात 'मटका किंग' या वेबसीरिजची प्रचंड चर्चा रंगत आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला. या सीरिजमध्ये अभिनेता विजय वर्माने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. अनेक लहान लहान भूमिका साकारुन आपल्या अभिनयाची छाप पाडणारा विजय या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तो चर्चिला जात आहे. अलिकडेच विजयने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर पहिल्यांदाच विजयने लग्नाविषयी भाष्य केलं आहे. विजयने अलिकडेच नवभारत टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सलमान खानने लग्न केलं तरच मी लग्न करेन, असं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर विजयच्या लग्नाविषयी अनेक चर्चा रंगत आहेत. यामध्येच त्याने सलमान खानच्या लग्नाचा उल्लेख केला. सलमाननंतर आता सगळे जण तुमच्या लग्नाची वाट पाहत आहेत. त्यातच तुमची आईसुद्धा तुमच्या घरी आली आहे. तर लग्नासाठी तुमच्यावर कौटुंबिक दबाव येतोय का? असा प्रश्न विजयला विचारण्यात आला. त्यावर, ''हो. खरंच. लग्नासाठी माझी आई सतत माझ्या मागे लागलेली असते. पण, आता ती मला सांगून सांगून थकली आहे. त्यामुळे ती फार काही आता बोलत नाही. आणि, प्रश्न सलमान खान यांचा असेल तर, जेव्हा ते लग्न करतील त्याच्यानंतर लगेचच मी लग्न करेन'', असं उत्तर विजय वर्माने दिलं.

दरम्यान, विजयने सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल केला. दहाड, गुस्ताख इश्क, गली बॉय यांसारख्या सिनेमात झळकला आहे. त्यानंतर तो मटका किंगमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. अंडरवर्ल्ड आणि मटका व्यवसायाची पार्श्वभूमी असलेली ही बहुचर्चित सीरिज १७ एप्रिल रोजी प्राइम व्हिडीओवर भारत आणि जगभरातील २४० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज एका अशा जगात घेऊन जाते, जिथे 'मटका' हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay Varma: Will Marry Only If Salman Khan Does!

Web Summary : Vijay Varma quipped he'll marry only after Salman Khan does, amidst 'Matka King' buzz and family pressure. He stars in the upcoming series about the underworld and Matka gambling world.
टॅग्स :बॉलिवूडसलमान खानतमन्ना भाटियासेलिब्रिटीसिनेमा