Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत जामवालला रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात! नेमकं काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 13:54 IST

'क्रॅक' सिनेमाच्या ट्रेलरमध्येही विद्युत जामवालच्या स्टंटची झलक पाहायला मिळाली. पण, हे स्टंट करणंच विद्युतच्या अंगाशी आलं आहे. विद्युत जामवालला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या आगामी क्रॅक या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अभिनयाबरोबरच विद्युत जबरदस्त फिटनेस आणि स्टंट करण्यासाठी ओळखला जातो. 'क्रॅक' सिनेमाच्या ट्रेलरमध्येही विद्युत जामवालच्या स्टंटची झलक पाहायला मिळाली. पण, हे स्टंट करणंच विद्युतच्या अंगाशी आलं आहे. विद्युत जामवालला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

डिएनएने दिलेल्या रिपोर्टनुसार, विद्युत जामवलला वांद्रे रेल्वे सुरक्षा दलातील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वांद्रे रेल्वे पोलीस स्थानकातील त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विद्युत जामवाल वांद्रे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये (PRF) बसल्याचं दिसत आहे. हॅलो मुंबई न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, जीवघेणे स्टंट केल्याप्रकरणी विद्युत जामवालला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

दरम्यान, विद्युत जामवालचा 'क्रॅक' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा २३ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विद्युत जामवालसोबत या सिनेमात जॉन अब्राहम, नोरा फतेही, एमी जॅकसन,  अंकित मोहन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :विद्युत जामवालरेल्वेसेलिब्रिटी