Join us

सारा अली खानच्या पोटावर दिसल्या भाजलेल्या खुणा, काळजी व्यक्त करण्याऐवजी नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 17:35 IST

सध्या तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकीच नम्र असलेली अभिनेत्री म्हणजे सारा अली खान (sara ali khan). 'केदारनाथ; (kedarnath) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराने आजवर अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. परंतु, अल्पावधीत अपार यश पाहूनही तिच्यातील नम्रपणा कायम आहे. त्यामुळेच सारा आज अनेकांची लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु, सध्या तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. यामध्ये साराच्या पोटावर जळाल्याच्या खुणा दिसून येत आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त करण्याऐवजी तिला ट्रोल केलं आहे. 

साराला चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पोटाला भाजलं. हे तिनं व्हिडीओ शेअर करुन सांगितलं होतं. यानंतर आज ती एका ठिकाणी स्पॉट झाली. यावेळी साराच्या पोटावर जळाल्याच्या खुणा दिसून आल्या. तिला चांगलंच भाजल्याचं दिसून येत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहलं की, 'मग हे दाखवण्याची गरज होती का?' तर दुसऱ्या यूजरने लिहिले, 'तुला जळालं असलं तरी ते लोकांना दाखवून बरे होईल का?' अशा अनेक कमेंट करुन यूजर्संनी सारा अली खानला टार्गेट केलं आहे.

याआधी साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने आपल्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला आहे.यामध्ये ती मेकअपरुममध्ये तिच्या स्टायलिस्टसोबत असल्याचं दिसून आलं. यामध्ये दिसतं की, तिची एक सहकारी साराची तक्रार करत आहे. "साराचं पोट भाजलं आहे आणि ही अजिबातच गंमतीची गोष्ट नाही' असं ती म्हणते. तेव्हा सारा म्हणते, जेव्हा तुम्ही दोन सिनेमांचं प्रमोशन करत आहात तेव्हा असं काहीतरी होणारच. आता काय करणार माझं पोट भाजलं, मला उशीर झाला, आता सगळ्यांना माझी वाट बघावी लागणार. माझ्या सहकारीला वाईट वाटतंय कारण मला खूप भाजलंय'.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या अगामी 'मर्डर मुबारक' व 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटांचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.  येत्या १५ मार्चला तिचा 'मर्डर मुबारक' चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर, विजय वर्मा, टिसका चोप्रा, डिंपल कपाडिया, संजय कपूर आणि सोहेल नय्यर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

टॅग्स :सारा अली खानसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरल