'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत दुबईहून परतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आता असं काही म्हटलं आहे जे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमान खानसाठी सोन्याची अंगठी घेतली" असा धक्कादायक दावा अभिनेत्रीने केला आहे. यासोबतच तिने 'बिग बॉस 19' कंटेस्टेंट तान्या मित्तललाही टोला लगावला आहे.
राखी सावंत एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिने दावा केला की, आपल्या दोन्ही किडन्या विकून तिने हे सर्व सामान खरेदी केलं आहे. तिने अभिनेता सलमान खानसाठी देखील सोन्याची अंगठी घेतली. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
"डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
"मी सोन्याचं पर्स घेतली आणि तुम्ही पाहिलं की, मी सलमान भाईसाठी एवढी मोठी सोन्याची अंगठी घेतली आहे. मी माझ्या दोन्ही किडन्या विकल्या आहेत. माझ्या दोन्ही किडन्या विकूनच मी हे सर्वकाही घेतलं आहे. सलमान भाईसाठी किडनी काय, मी काहीही विकू शकते" असं राखीने म्हटलं आहे.
राखी सलमानला भाऊ मानते. अभिनेत्याने तिला तिच्या कठीण काळात खूप मदत केली होती. राखीचं सलमानवर असलेलं प्रेम लपून राहिलेलं नाही. जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ती ते व्यक्त करत असते. त्याच्यासाठी स्टँड घेत असते. सलमानला कोणी काही बोललं तर राखी चोख प्रत्युत्तर देते. राखीने तान्या मित्तलला खोचक टोला लगावला आहे. "मी इतकी श्रीमंत आहे की, मी दुबईला जाऊन माझे केस कलर करून घेतले" असं म्हटलं आहे.
Web Summary : Rakhi Sawant claims she sold her kidneys to buy a gold ring for Salman Khan. She also took a dig at 'Bigg Boss 19' contestant Tanya Mittal, asserting her wealth.
Web Summary : राखी सावंत ने दावा किया कि उन्होंने सलमान खान के लिए सोने की अंगूठी खरीदने के लिए अपनी किडनी बेच दी। उन्होंने 'बिग बॉस 19' की प्रतियोगी तान्या मित्तल पर भी अपनी समृद्धि का दावा करते हुए तंज कसा।