Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी कौशलचा 'सॅम बहादुर' ओटीटीवर प्रदर्शित होणार; वाचा कुठे पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 13:04 IST

'सॅम बहादुर'  चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो सिनेमा अखेर शुक्रवारी (१ डिसेंबर) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई सुरू आहे.  'सॅम बहादुर'  चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत असून विकीच्या अभिनयाने चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे.  चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाकडे विकीचे चाहते डोळे लावून बसले आहेत. आता या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबद्दल अपडेट समोर आलं आहे. 

'सॅम बहादुर' हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होईल, असं म्हटलं जात आहे. अद्याप ओटीटी रिलीज डेट समोर आलेली नाही. 

'सॅम बहादूर' चित्रपटातून फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं भूमिकेत आहे. 'सॅम बहादूर'मध्ये माणेकशॉ यांची भूमिका साकारण्यासाठी विकी कौशलने खूप मेहनत घेतली होती. विकी कौशलबरोबर या सिनेमात सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :विकी कौशलबॉलिवूडसेलिब्रिटी