Join us
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैय्या ट्विटर पे आजा! विकी कौशलच्या नव्या गाण्याचे बोल ऐकून नेटकरी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:19 IST

विकी कौशल नुकताच त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचला.

बॉलिवूडचा हँडसम अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आगामी 'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचं पहिलं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. मात्र गाण्याचे बोल ऐकून नेटकऱ्यांचा संताप होत आहे. 'कन्हैय्या ट्विटर पे आजा' असे गाण्याचे शब्द आहेत. अशा प्रकारचे शब्द लिहिण्यामागे काय लॉजिक आहे असा थेट प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

विकी कौशल नुकताच त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचला. तिथेच 'कन्हैय्या ट्विटर पे आजा' हे गाणं लाँच करण्यात आलं. विकीने यावेळी गाण्यावर डान्सही केला. हुकस्टेप्स केल्या. मात्र गाण्याचे विचित्र बोल ऐकून नेटकऱ्यांना प्रश्नच पडला. असं गाणं लिहिण्यामागे नेमका काय हेतू आहे असाच प्रश्न सर्वांना पडला. वायआरएफ'वाले कधीपासून भोजपुरी गाणी लिहायला लागले असं म्हणत एकाने खिल्ली उडवली. विकी कौशलने गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. याला त्याने 'भजन कुमार अॅट युअर द्वार' असं भन्नाट कॅप्शनही दिलं आहे.

कन्हैय्या ट्विटर पे आजा हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. तर प्रीतमने संगीत दिले आहे. गाण्याते नृत्यदिग्दर्शन विजय ए गांगुली यांनी केले आहे. 'काहीही लिरीक्स','कोणी लिरीक्स लिहिले लाज वाटली पाहिजे','इतक्या शिव्या ऐकूनही अशी गाणी घेतात, हे लोक जाणूनबुजून असं वागतात का?' असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले. 

'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमा २२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये मानुषी छिल्लर विकी कौशलसोबत झळकणार आहे.विजय कृष्ण आचार्य यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर विकीच्या या आगामी सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :विकी कौशलबॉलिवूडट्रोल