'छावा' (chhaava movie) सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालाय. ज्या सिनेमाची जगभरातील चाहते आणि शिवप्रेमी वाट पाहत होते. 'छावा' रिलीज होताच पहिलाच दिवसापासून सिनेमाला प्रेक्षकांचा हाउसफुल्ल प्रतिसाद मिळाला. आज दुसरा दिवस सुरु झालाय तरीही 'छावा'ची क्रेझ काही संपत नाहीये. अशातच 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलने (vicky kaushal) एक खास व्हिडीओ शेअर केलाय. यात एका मुलाने 'छावा'च्या पोस्टरवर चढून दुधाचा अभिषेक केलाय.
'छावा'निमित्त एकच जयघोष
विकी कौशलने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर 'छावा'निमित्त एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत उदगीरमध्ये राहणारा एक मुलगा त्या भागातील असलेल्या थिएटरमध्ये 'छावा'चं जे पोस्टर लागलेलं असतं त्याच्यावर चढतो. तो मुलगा मोठ्याने छत्रपती संभाजी महाराज की जय! असं म्हणतो. पुढे हातातली दुधातली पिशवी फोडून तो पोस्टरवर सर्वत्र दुधाचा अभिषेक करतो. विकी कौशलने हा व्हिडीओ शेअर करुन छत्रपती संभाजी महाराज की जय..! असं कॅप्शन लिहिलंय. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय.