Join us

विक्की कौशलने कॅटरिना कैफला केलं लग्नासाठी प्रपोज, सलमानची होती अशी Reaction व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 17:28 IST

कॅटरिना कैफ आणि सलमान खानच्या लव्हस्टोरीमध्ये रणबीर कपूरने एन्ट्री घेतली आहे आणि दोघांचे नातं संपले. कॅट रणबीरसोबत पुढे निघून गेली.

ठळक मुद्देकॅटने विक्कीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती विक्कीने थेट कॅटरिनाला लग्नासाठी प्रमोज केला

कॅटरिना कैफ आणि सलमान खानच्या लव्हस्टोरीमध्ये रणबीर कपूरने एन्ट्री घेतली आहे आणि दोघांचे नातं संपले. कॅट रणबीरसोबत पुढे निघून गेली. मात्र रणबीर आणि कॅटरिनाचे नातंही फार काळ टिकलं नाही. काहीवेळानंतर पुन्हा कॅट भाईजानकडे आली. मात्र नुकताच असा एक प्रसंग झाला ज्यामुळे काही वेळासाठी सलमान खानने दीर्घश्वास घेतला.          

नुकतीच कॅट करण जोहरच्या चॅट शोमध्ये आली होती त्यावेळी तिला सध्याच्या कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडले असा प्रश्न विचारण्यात आला होता. कॅटने यावर विक्की कौशलचे नाव घेतले होते. विक्कीला जेव्हा करणने जेव्हा ही गोष्ट सांगितले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. नुकतेच एका अवॉर्ड शोमध्ये विक्की आणि कॅटचा सामना झाला. त्यावेळी विक्कीने थेट कॅटरिनाला लग्नासाठी प्रमोज केला. विक्कीने कॅटला सलमानचे गाणं ''मुझसे शादी करोगे'' गात प्रपोज केल्याचे या व्हिडीओमधून कळतेय. यावर कॅटही आवाक् झाली आणि म्हणाली हिम्मत नाही आहे ज्यावर सलमानचा चेहरा बघण्या लायक झाला होता.  लवकरच सलमान आणि कॅटरिना भारत सिनेमात एकत्र दिसणार आहे. प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफला या सिनेमात कास्ट करण्यात आले. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.  

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफविकी कौशलभारत सिनेमा