Join us

फोटोतील 'हा' मुलगा आज आहे तरुणींचा क्रश, 'बॅकग्राऊंड डान्सर'चा आहे अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:59 IST

अभिनेत्यांनी पोस्ट केलेले बालपणीचे फोटो अनेकदा ओळखुही येत नाहीत. आतासुद्धा एका अभिनेत्याने डान्स करतानाचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे.

बॉलिवुड अभिनेता विकी कौशल चर्चेत आहे  गोविंदा नाम मेरा या आगामी सिमनेमामुळे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरला तर प्रेक्षकांनी खुपच प्रतिसाद दिला आहे. विकी कौशल प्रमोशनसाठी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत असून चाहते  खुपच पसंत करत आहेत.

आता विकी कौशल ने इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकला असून यामध्ये तो बॅकग्राउंड डान्सर दिसत आहे. हा त्याचा शाळेतील फोटो दिसतोय. विकी किती छान एन्जॉय करत डान्स करतो हे अनेकदा आपण बघितले. तर हे तो लहानपणापासूनच करत आलाय असे या फोटोतुन दिसते. शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन दरम्यानचा हा फोटो वाटतोय तर विकी सर्वात मागे असून पुढे दोन मुली डान्स करत आहेत.

'गोविंदा नाम मेरा' हा सिनेमा १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.यामध्ये विकी सोबत भुमी पेडणेकर आणि किआरा अडवाणी देखील मुख्य भुमिकेत आहेत. 

टॅग्स :विकी कौशलनृत्यइन्स्टाग्राम