Join us

Vicky Kaushal,Katrina Kaif :  सून असावी तर अशी...! कतरिनाने पती विकी व सासूबाईसोबत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 14:38 IST

Vicky Kaushal,Katrina Kaif : कतरिना कैफ पती विकी कौशल आणि सासूसोबत सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. हे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी कतरिनाचं कौतुक सुरू केलं आहे...

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सध्या देवदर्शनात मग्न आहेत. अनुष्का शर्मा व विराट कोहली नुकतेच वृंदावनला गेले होते. जॅकलिन फर्नांडिस वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोहोचली होती. आता विकी कौशल (Vicky Kaushal ) व कतरिना कैफ (Katrina Kaif ) हे जोडपं सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलं. या जोडप्यानं  सुद्धा देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात केली. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विकी-कतरिनाने बाप्पाचं दर्शन घेतलं. कतरिनाच्या सासूबाई वीणा कौशल यादेखील या जोडप्यासोबत होत्या.

सिद्धीविनायक मंदिरातले या तिघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 

कतरिनाने यावेळी ग्रीन कलरच सलवार सूट घातला आहे. मंदिरात दर्शनावेळी तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. अतिशय भक्तीभावाने ती बाप्पाचं दर्शन घेत आहे. विकीच्या हातात प्रसाद व पूजेच्या साहित्याचं ताट आहे. हे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी कतरिनाचं कौतुक सुरू केलं आहे. कतरिना खरंच विकीला आणि त्याच्या घराला मनापासून स्वीकारलं आहे. ती पंजाबी सूनेचं कर्तव्य पार पाडतेय, अशा शब्दांत अनेक चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सून असावी तर अशी असंही अनेकांनी म्हटलं आहे.

 नुकतेच विकी व कतरिना राजस्थानमधून परतले. राजस्थानमधील पाली इथं हे कपल सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलं होतं. तिथे जाण्यापूर्वी कतरिना आणि विकीने त्यांच्या मुंबईतल्या घरी ख्रिसमसनिमित्त छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं.  

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकीचा ‘गोविंदा मेरा नाम’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. यामध्ये तो कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर सोबत दिसला होता. तर गेल्या वर्षी कतरिनाचा ‘फोन भूत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये ती सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्यासोबत झळकली होती. 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल