Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पुष्पा २'मुळे 'छावा'च्या निर्मात्यांचा प्लॅन फसला! या तारखेला विकी कौशलचा सिनेमा होणार रिलीज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 13:31 IST

या वर्षातील बहुचर्चित 'छावा' सिनेमा 'पुष्पा २'मुळे चांगलाच अडकला असून सिनेमाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आलीय

विकी कौशलचा 'छावा' या वर्षातील बहुचर्चित सिनेमांपैकी एक आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलचा 'छावा'चा टीझर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.  यावेळी सिनेमाच्या टीमने ६ डिसेंबर ही रिलीज डेटही जाहीर केली होती. परंतु नंतर 'पुष्पा २'चे वारे वाहू  लागले आणि या सर्वांमध्ये 'छावा'ची चर्चा थांबली. आता 'छावा' नेमका कधी रिलीज होणार, याविषयीचा अंदाज वर्तवणारा एक रिपोर्ट समोर आलाय. 

छावा नेमका कधी रिलीज होणार?

विकी कौशलचा 'छावा' नेमका कधी रिलीज होणार याचा अंदाज लावणारा एक मीडिया रिपोर्ट समोर आलाय. सुरुवातीला ६ डिसेंबरला रिलीज होणारा 'छावा' पुढे ढकलून २० डिसेंबरला रिलीज होण्याची  शक्यता होती. २० डिसेंबरला नाना पाटेकर-अनिल शर्मा यांचा 'वनवास' सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे 'छावा'चं प्रदर्शन थेट पुढील वर्षी ढकलण्यात आलं असून नवीन वर्षात १० जानेवारी २०२५ ला 'छावा' सिनेमा रिलीज होऊ शकतो. 

छावाची टक्कर राम चरणच्या गेम चेंजरशी होणार?

'छावा' १० जानेवारीला रिलीज होणार असल्याने त्याची टक्कर राम चरणच्या 'गेम चेंजर'शी होणार आहे. 'गेम चेंजर'चा टीझर नुकताच रिलीज झाला असून हा सिनेमा मकरसंक्रांतीला रिलीज होणार आहे. त्यामुळे जर 'छावा' १० जानेवारीला रिलीज होणार असेल तर त्याची टक्कर 'गेम चेंजर'शी होईल. त्यामुळे 'छावा'ला सोलो रिलीज डेट मिळणं अवघड आहे, यात शंका नाही. मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा'चा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे.

टॅग्स :विकी कौशलपुष्पाअल्लू अर्जुन