Join us

अमूलकडून विकी कौशलला कौतुकाची थाप; शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 18:01 IST

'सॅम बहादुर'  चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई सुरू आहे.  'सॅम बहादुर'  चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत असून विकीच्या अभिनयाने चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे. विकीच्या मेहनतीचेही सगळीकडे कौतुक होत आहे. आता 'सॅम बहादूर' बनलेल्या विक्की कौशलचे अमूलने खास अभिनंदन केले आहे.

'सॅम बहादूर' हा विक्की कौशलच्या सर्वोत्तम प्रोजेक्टपैकी एक आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 25 कोटींचा आकडा गाठला आहे. चाहते विकीच्या अभिनयाचे कौतुक करताना थकत नाहीत. यातच अमूल बटरच्या जाहिरातीद्वारे विक्की कौशलचे खास अभिनंदन करण्यात आले आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर करून अमूलचे आभार मानले आहेत. 

'सॅम बहादूर' चित्रपटातून फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं भूमिकेत आहे. विकी कौशलबरोबर सान्याने या सिनेमात विकीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा शेख माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :विकी कौशलबॉलिवूडसेलिब्रिटी