Join us

संपता संपेना ‘या’ कपलचा ‘लपंडाव’, मीडियापासून वाचण्यासाठी जीवाचा आटापीटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 08:00 IST

तरीही बोभाटा झालाच....

ठळक मुद्दे मध्यंतरी ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती.

बॉलिवूडमध्ये सध्या कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या डेटींगच्या बातम्यांना जोर चढला आहे. होय, दिवाळी पार्टी कॅट आणि विकी पहिल्यांदा कॅमे-यांत कैद झाले आणि दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. आता पुन्हा एकदा विकी व कतरीना एकत्र दिसले आणि चर्चांना आणखी जोर चढला.होय, अलीकडे प्रोड्यूसर आरती शेट्टीने घरी डिनर पार्टी ठेवली. या पार्टीत विकी व कतरीना सामील झाले. अर्थात मीडियाच्या नजरेतून स्वत:ला वाचवण्यासाठी दोघेही वेगवेगळ्या कारमधून आले. पण तरीही बोभाटा झालाच.

यावेळी कतरीनाने प्रिंटेड ड्रेस कलरचा ड्रेस घातला होता. तर विकी ब्लॅक कलरच्या टी-शर्टसोबत ब्लॅक हुडीमध्ये होता.

यापूर्वी अंबानीच्या दिवाळी पार्टीत कतरीना व विकी एकत्र दिसले होते.  पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्र बाहेर पडले होते. पण बाहेर मीडियाला पाहताच दोघांनीही मार्ग बदलला होता. पापाराझींना बघताच कतरीना अक्षरश: भींतीआड लपली होती. दुसरीकडे ‘तो मी नव्हेच’ अशा थाटात विकी कतरीनाला इग्नोर करून एकटा कारमध्ये बसून निघून गेला होता . हा सगळा सीन कॅमे-यात कैद झाला होता. 

 

 मध्यंतरी ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती.  कतरीना आणि विकी शेवटच्या रांगेत एकत्रच चित्रपट पाहायला बसले होते. चित्रपट संपल्यावर विकी आणि कतरिना थिएटरच्या दारापर्यंत एकत्र चालत आले परंतु, बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सना पाहून मात्र त्यांनी आपला मार्ग बदलला होता. 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल