Join us

श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' मध्ये 'हा' अभिनेता करणार कॅमिओ, चाहत्यांना मिळणार सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 13:21 IST

आता एक मोठं अपडेट 'स्त्री २' सिनेमासंदर्भात आलं आहे. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.श्रद्धाच्या चित्रपटांची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. श्रद्धाची खासियत म्हणजे ती जेव्हाही चित्रपट घेऊन येते, तेव्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडते. श्रद्धाचा बहुचर्चित 'स्त्री २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता एक मोठं अपडेट सिनेमासंदर्भात आलं आहे. 

श्रद्धाच्या 'स्त्री २' मध्ये प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. या चित्रपटात एक अभिनेता कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून वरुन धवण आहे. सिनेमामध्ये वरुण हा 'भेडिया'च्या भूमिकेत दिसणार आहे.  बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, वरुण धवनने अलीकडेच मुंबईतील एका स्टुडिओमध्ये 'स्त्री' चित्रपटातील कॅमिओच्या भूमिकेसाठीचं शूटिंग पुर्ण केलं आहे. 

 श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'स्त्री' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन, विजय राझ, नोरा फतेही, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार झळकले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मूळ चित्रपट जिथं संपतो तिथून चित्रपटाचा पुढचा भाग सुरू होणार आहे. आता या सीक्वेलची उत्सुकता चाहत्यांना आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरसेलिब्रिटीसिनेमाराजकुमार रावबॉलिवूडवरूण धवन