Join us

उंगली पकडके तुने..! वरुण धवनने 'फादर्स डे' निमित्त शेअर केला लेकीचा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 13:20 IST

वरुण धवनने फादर्स डे निमित्त लेकीचा खास फोटो शेअर केलाय. वरुणची गोंडस मुलगी त्याचा हात घट्ट पकडताना दिसतेय (varun dhawan)

आज 'फादर्स डे'. आयुष्यातल्या 'बापमाणसा'प्रती आदर व्यक्त करण्याचा खास दिवस. 'फादर्स डे' निमित्त अनेकजण त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच मराठी कलाकारांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण वडिलांसोबतचे फोटो शेअर करत आहेत. अशातच नुकताच बाबा झालेला बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने 'फादर्स डे' निमित्त लेकीसोबतचा खास फोटो शेअर केलाय. 

वरुणने शेअर केला लेकीचा क्यूट फोटो

आज 'फादर्स डे' निमित्त वरुणने लेकीचा खास फोटो शेअर केलाय. या फोटोत वरुणचा हात त्याच्या लेकीने घट्ट पकडलेला दिसतोय. फोटोखाली वरुणने कॅप्शन लिहिलंय की, "फादर्स डेच्या शुभेच्छा. माझ्या वडिलांनी मला शिकवले की हा दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाहेर जाऊन माझ्या कुटुंबासाठी काम करणे. त्यामुळे मी तेच करेन. एका मुलीचा बाप होणं ही सगळ्यात आनंदी गोष्ट आहे." वरुणच्या या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत पसंती दिली आहे.

वरुण धवनचे आगामी सिनेमे

वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी 4 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. याशिवाय मीडिया रिपोर्ट्सनुसार वरुणने सहकारी अभिनेता हृतिक रोशनचे मुंबईतील जुहू येथील आलिशान सी-फेसिंग घर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. वरुण लवकरच ॲटली निर्मित 'बेबी जॉन' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय वरुण 'स्त्री 2'मध्येही दिसणार आहे.

टॅग्स :वरूण धवनबॉलिवूडबेबीज डे आऊट