Join us

Urvashi Rautela, Rishabh Pant : तौबा मेरी तौबा! रिषभसोबतच्या अधुऱ्या प्रेमकहाणीवर उर्वशीचं नवं गाणं? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 14:18 IST

'किस्मत बुरी थी मेरी, ना वो शख्स बुरा था जिस वक्त दिल लगाया ...' या ओळी लिहित उर्वशीने दु:ख व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि भारतीय फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्याबाबत काहीौ ना काही चर्चा सतत सुरु असतात. रिषभ पंत सध्या मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचार घेत आहे. तर दुसरीकडे उर्वशी काही ना काही पोस्ट करत लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने कोकीलाबेन रुग्णालयाचा बाहेरुन फोटो स्टोरीमध्ये पोस्ट केला होता आणि चर्चेला उधाण आले होते. आता उर्वशीचं एक नवं गाणं रिलीज होत आहे. हे गाणं तिच्या आणि रिषभच्या अधुऱ्या प्रेमकहाणीवर बेतलेलं आहे अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

उर्वशीच्या गाण्याचे पोस्टर रिलीज 

उर्वशीचं हे नवं गाणं लवकरच रिलीज होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत टीव्ही अभिनेता शरद मल्होत्रा (Sharad Malhotra) दिसत आहे. तौबा मेरी तौबा' असं तिच्या या नवीन गाण्याचं टायटल आहे. गाण्याचे पोस्टर शेअर केल्यानंतर त्याखाली तिने दिलेले कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. तिने लिहिले, 'किस्मत बुरी थी मेरी, ना वो शख्स बुरा था जिस वक्त दिल लगाया, वो वक्त बुरा था.'

तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.'रिषभ भाई आता तरी ऐका का उर्वशीला रडवताय प्रेमच तर केलंय.'

आता उर्वशीचं हे गाणं रिषभ आणि तिच्या नात्यावरच आहे काय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. उर्वशी आणि रिषभची अधुरी प्रेमकहाणी आता गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं बोललं जात आहे. ६ फेब्रुवारी रोजी गाणं रिलीज होत आहे. बादशाहने गाण्याचे बोल लिहिले आहेत तर ममता शर्मा यांनी गाणं गायलं आहे. आता हे गाणं खरंच रिषभ आणि उर्वशीच्या नात्यावर असणार आहे का हे ६ फेब्रुवारीलाच कळेल.

उर्वशीनं मुलाखतीत रिषभ पंतचं नाव न घेता सांगितलं होतं की एकेकाळी एक व्यक्ती हॉटेलच्या लॉबीमध्ये माझी १०-१० तास वाट पाहात बसायचा. उर्वशीचा हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रिषभ पंतनंही तिच्यावर टीका करत एक इन्स्टास्टोरी पोस्ट केली होती. रिषभनं उर्वशीचं नाव न घेता.. 'पीछा छोड दो बहन', असं म्हटलं होतं. दरम्यान, स्टोरी पोस्ट केल्याच्या काही मिनिटांनी रिषभनं ती डिलीट केली होती. पण दोघांमधील वाद अजूनही कायम आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतसोशल मीडिया