Join us

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने शेअर केला पाकिस्तानी क्रिकेटरसोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ आणि मग...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 14:56 IST

Urvashi Rautela : गेल्या काही दिवसांपासून उर्वशी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबतच्या वादामुळे चर्चेत होती. आता काय तर ती एका पाकिस्तानी क्रिकेटपटूमुळे चर्चेत आली आहे.

‘हेट स्टोरी 4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसं राहायचं हे उर्वशीला चांगलंच कळतं. सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी  उर्वशी सध्या मात्र एका वेगळाच कारणाने चर्चेत आली आहे.गेल्या काही दिवसांपासून उर्वशी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबतच्या वादामुळे चर्चेत होती. आता काय तर ती एका पाकिस्तानी क्रिकेटपटूमुळे चर्चेत आली आहे.  कदाचित आता उर्वशी या पाकिस्तानी क्रिकेटपटूवर लट्टू झाली आहे. त्याचं नाव नसीम शाह (Naseem Shah).

होय, उर्वशीने नसीम शाहसोबतचा एका फॅन पेजचा व्हिडीओ तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आणि मग काय? सोशल मीडियावर उर्वशी आणि उर्वशीचीच चर्चा रंगली. अनेकांनी यावरून उर्वशीला ट्रोल करायला सुरूवात केली. यावरचे मजेदार मीम्सही व्हायरल झालेत.

व्हिडिओत उर्वशी क्रिकेट मॅच पाहताना दिसत आहे. तर पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाह उर्वशीला पडद्यावर पाहून स्माईल देताना दिसत आहे. नसीमला हसताना पाहून उर्वशीही  स्माईल देताना दिसून येत आहे.

व्हिडीओ मजेशीर आहे. पण उर्वशीने तो शेअर केला आणि लोकांनी तिला फैलावर घेतलं. हे प्रकरण जरा जास्तच अंगलट येतय म्हटल्यावर थोड्याच वेळात उर्वशीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून हटवला. परंतु आता काही फॅनपेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. साहजिकच उर्वशी पुन्हा ट्रोल होतेय. उर्वशी आणि नसीम शाह यांच्यावरचे भन्नाट मीम्सही व्हायरल होत आहेत. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करून अनेक मजेशीर मीम्स बनवण्यात आले आहेत. उर्वशी व रिषभ यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळालं होतं. उर्वशीने एका मुलाखतीत अप्रत्यक्षपणे रिषभवर भाष्य करताना तो मला भेटण्यासाठी 12-14  तास  थांबला होता व त्याने मला 60 मिस्ड कॉल दिल्याचे तिने म्हटलं होतं. त्यावर रिषभनेही सडेतोड उत्तर दिलं होतं.

 

टॅग्स :उर्वशी रौतेलापाकिस्तानएशिया कप 2022रिषभ पंत