Join us

Urvashi Rautela : ते SORRY रिषभ पंतसाठी नव्हतं...! व्हायरल व्हिडीओवर उर्वशी रौतेलाने केला खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 17:42 IST

Urvashi Rautela clarify on her 'I'm sorry' remark : उर्वशी रिषभसोबत पॅचअप करण्याच्या मूडमध्ये आहे आणि म्हणून सॉरी म्हणतेय, असाच तिच्या सॉरीचा अर्थ सगळ्यांनी घेतला होता. पण उर्वशीची माफी रिषभ पंतसाठी नव्हतीच. मग कुणासाठी होती?

Urvashi Rautela  clarify on her 'I'm sorry' remark : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela  ) गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर रिषभ पंतसोबतच्या (Rishabh Pant) वादामुळे चर्चेत होती. पण कालपासून ती ‘सॉरी’ प्रकरणामुळे चर्चेत आहे. होय, काल उर्वशीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या व्हिडीओत उर्वशी अगदी हात जोडून माफी मागताना दिसली. सॉरी, आय अ‍ॅम सॉरी..., असं ती म्हणाली. खरं तर हे ‘सॉरी’ रिषभ पंतसाठीच आहे, असाच सर्वांचा अंदाज होता. कारण रिषभ पंतला काय मॅसेज देशील? या प्रश्नावर तिने ‘सॉरी’ म्हटलं होतं. त्यामुळे उर्वशी रिषभसोबत पॅचअप करण्याच्या मूडमध्ये आहे आणि म्हणून सॉरी म्हणतेय, असाच तिच्या सॉरीचा अर्थ सगळ्यांनी घेतला होता. पण उर्वशीची माफी रिषभ पंतसाठी नव्हतीच. मग कुणासाठी होती? तर आता खुद्द उर्वशीने त्याचा खुलासा केला आहे.

उर्वशीने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. यात तिने सॉरी प्रकरणावर खुलासा केला आहे. माझी माफी रिषभ पंतसाठी नव्हती तर ती माझे चाहते आणि खास लोकांसाठी होती, असं तिने म्हटलं आहे.

काय म्हणाली होती उर्वशी?

आरपीला तू काही मॅसेज देऊ इच्छिते का? असा प्रश्न व्हायरल व्हिडीओत मुलाखत घेणारा उर्वशीला विचारतो आहे. यावर सीधी बात, नो बकवास..... असं उर्वशी म्हणते. यानंतर मुलाखत घेणारा पुन्हा तोच प्रश्न रिपीट करतो. तू रिषभ पंतला काही सांगू इच्छिते का? कारण तूच म्हणाली होतीस की ... यावर मी काहीही सांगू इच्छित नाही, असं ती आधी म्हणते. पण यानंतर सॉरी, आय अ‍ॅम सॉरी असं हात जोडून म्हणताना दिसते.पण आता ते सॉरी रिषभ पंतसाठी नव्हतं असं उर्वशी म्हणतेय. आता तुम्हाला काय वाटतंय ते तुम्हीच ठरवलेलं बरं...!!

टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतबॉलिवूड