Join us

Video:उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला लीक; इंटरनेटवर होतोय वाऱ्याच्या वेगाने व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 13:53 IST

Urvashi rautela: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्वशी शॉवर घेत असून तिचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अनेकदा तिच्या अभिनयापेक्षा बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे ती सतत चर्चेचा विषय ठरत असते. मात्र, यावेळी ती एका लीक झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. उर्वशीचा बाथरुममधील व्हिडीओ लीक झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या गतीने व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्वशी शॉवर घेत असून तिचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे. उर्वशीची हा व्हिडीओ तिच्या खऱ्या आयुष्यातील नसून सनम रे या चित्रपटातील एक सीनचा भाग आहे. हा व्हिडीओ उर्वशीनेच तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, उत्तराखंडमधील हरिद्वार येथे लहानाची मोठी झालेल्या उर्वशीने वयाच्या १५ व्या वर्षीच मॉडलिंगची सुरुवात केली. २००९ मध्ये तिने 'मिस टीन इंडिया' चा खिताब जिंकला. तसंच तिने 'मिस इंडिया प्रिंसेस', 'मिस टूरिज्म वर्ल्ड', 'मिस इंडिया सुपरमॉडल' हे खिताबही तिच्या नावावर केले आहेत. उर्वशीने 'सिंह साहेब द ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेता सनी देओलने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

टॅग्स :उर्वशी रौतेलाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा