Join us
Daily Top 2Weekly Top 5

Urvashi Rautela : दिवाळी कुठे साजरी करू? उर्वशी रौतेलाचा प्रश्न अन् चाहत्यांचं उत्तर; म्हणाले, आधी रिषभ पंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 12:22 IST

Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाकडे फार काही काम नाही. पण याऊपर चर्चेत कसं राहायचं हे तिला चांगलंच कळतं...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाकडे ( Urvashi Rautela )फार काही काम नाही. पण याऊपर चर्चेत कसं राहायचं हे तिला चांगलंच कळतं. गेल्या काही दिवसांपासून उर्वशीची जोरदार चर्चा आहे. कारण आहे क्रिकेटपटू रिषभ पंत (Rishabh Pant ). होय, रिषभ पंतसोबत तिचं नाव जोडलं जात आहे आणि यामुळेच उर्वशी सतत चर्चेत आहे. उर्वशीने सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकताच सोशल मीडिया युजर्स त्याचा संबंध थेट रिषभ पंतशी जोडतात. आता हेच बघा ना, उर्वशीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आणि लोकांनी पुन्हा एकदा त्याचा संबंध रिषभ पंतशी जोडला.  

व्हिडिओमध्ये उर्वशी नाचताना व नेमबाजी करताना दिसत आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये उर्वशीने चाहत्यांना एक प्रश्न केला. ‘यंदाची दिवाळी मी भारतात साजरी करू की ऑस्ट्रेलियामध्ये?,’ असे तिने विचारलं. मग काय? या प्रश्नावर चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट केल्यात.

‘पंत भाई को मना लो पहले, फिर दिवाली मनाना,’अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘तुझी दिवाळी तर रिषभ पंतला पाहूनच साजरी होईल,’ अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. ‘कुठेही साजरी कर आम्हाला काय, आमच्या घरी येऊन थोडीच दिवाळी साजरी करणार आहेस,’ अशी एक कमेंटही वाचायला मिळतेय. अनेकांनी उर्वशी पंतच्या प्रेमात वेडी झाल्याचं म्हटलं आहे. काहींनी तर उर्वशीची अवस्था बघून रिषभ पंतला टॅग करत, प्लीज तिला होकार दे, अशी विनंती केली आहे. अरे ती वेडी झालीये तुझ्या प्रेमात, होकार दे भावा..., अशी कमेंट एका युजरने केली आहे.

काही दिवसांआधी उर्वशीने रिषभ पंतला जाम डिवचलं होतं. अगदी रिषभ पंतला ‘छोटू भैय्या’ म्हणत तिने त्याची टर उडवली होती. यानंतर रिषभनेही तिला सडेतोड उत्तर दिलं होतं. हा वाद गेल्या काही दिवसांपासून सतत गाजतोय. या वादाची सुरूवात झाली होती ती एका व्हिडीओने. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर उर्वशीच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि यात उर्वशी अप्रत्यक्षपणे रिषभवर बोलली होती. ‘तो मला भेटण्यासाठी 12-14  तास  थांबला होता व त्याने मला 60 मिस्ड कॉल दिले होते,’असं उर्वशी म्हणाली होती.  उर्वशीच्या या मुलाखतीच्या व्हिडीओवर रिषभने जळजळीत प्रतिक्रिया दिली होती. ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांना मुलाखतीत खोटं बोलताना पाहून, गंमत वाटतेय...’,असं तो म्हणाला होता. यावर उर्वशी गप्प कशी राहणार होती? तिने यावर प्रत्युत्तर देत रिषभला छोटू भैय्या म्हटलं होतं. ‘छोटू भैया को बैट बॉल खेलना चाहिए. मैं कोई मुन्नी नहीं हूं डार्लिंग बच्चे तेरे लिए बदनाम होने को...,’ असं ती म्हणाली होती. उर्वशी व रिषभ यांच्यातील या शाब्दिक युद्धाची मीडियात खमंग चर्चा रंगली होती.  

टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतबॉलिवूड