Join us

डेब्यू चित्रपटात लिपलॉक सीन दिल्यानं अभिनेत्री आली होती वादात, ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 19:11 IST

आपल्या पहिल्याच चित्रपटात किसिंग सीन दिल्यानं अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती. 

 जुन्या काळात चित्रपटांमध्ये लिपलॉक सीन पाहणे फारच दुर्मिळ होते. पण, आता सिनेमात रोमँटिक सीन नाहीत असं कधीच होत नाहीत.  प्रत्येक सिनेमात एखादा रोमँटिक किंवा बोल्ड सीन पाहायला मिळतोय.  सिनेमात सर्सारपणे किसिंग सीन पाहायला मिळतात. असाच  एक किसिंग सीन आहे, ज्यामध्ये अभिनेत्यानं आपल्यापेक्षा ३६ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन दिला होता. विशेष म्हणजे अभिनेत्रीचा तो डेब्यू चित्रपट होता. आपल्या पहिल्याच चित्रपटात किसिंग सीन दिल्यानं अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती. 

५५ वर्षीय अभिनेत्याने १९ वर्षीय अभिनेत्रीसोबत  किसिंग सीन दिल्यानं मोठी चर्चा झाली होती. तो अभिनेता होता सनी देओल (Sunny Deol) तर अभिनेत्री होती उर्वशी रौतेला (Urvashi Rautela). उर्वशीने २०१३ मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्या आणि सनी देओलमध्ये एक रोमँटिक सीन शूट करण्यात आला होता, ज्यामध्ये दोघांनाही लिपलॉक करावं लागलं होतं. त्यावेळी उर्वशी १९ वर्षांची होती आणि सनी हा ५५ वर्षांचा होता. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी सनी देओल आणि उर्वशी या दोघांनाही टीकेचा सामना करावा लागला होता. 

 'सिंग साब द ग्रेट' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. पण अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या पहिल्याच चित्रपटात तिच्या हॉटनेसमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. ती यानंतर अनेक चित्रपटांमध्येही बोल्ड इमेजमध्ये दिसली. 

टॅग्स :उर्वशी रौतेलासनी देओल