Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीरनंतर विकी कौशलबरोबर बोल्ड झाली तृप्ती डिमरी, नेटकरी म्हणाले- "मल्लिका आणि सनी लिओनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 13:03 IST

विकी कौशलबरोबर रोमान्स केल्याने ट्रोल झाली तृप्ती डिमरी, नेटकरी सनी लिओनी आणि मल्लिकाशी केली तुलना

अॅनिमल या सिनेमानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. या सिनेमात रणबीर कपूरसोबत बोल्ड सीन्स दिल्याने तृप्ती चर्चेत आली होती. अॅनिमलनंतर आता तृप्तीच्या 'बॅडन्यूज' सिनेमाची प्रचंड चर्चा रंगली आहे. या सिनेमात तृप्ती अभिनेता विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकतंच 'बॅडन्यूज' सिनेमातील विकी कौशल आणि तृप्ती यांचं 'जानम' हे रोमँटिक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. पण, या गाण्यामुळे तृ्प्तीला ट्रोल करण्यात येत आहे. 

'बॅडन्यूज' सिनेमातील जानम या गाण्यात विकी कौशल आणि तृप्ती यांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्यात विकी आणि तृप्ती रोमान्स करताना दिसत आहे. विकी-तृप्तीची केमिस्ट्री तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण, या गाण्यामध्ये इंटिमेट सीन्स दिल्याने तृ्प्ती डिमरीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी तृप्तीची तुलना सनी लिओनी, राखी सावंत आणि मल्लिका शेरावतबरोबर केली आहे. विकीच्या सोशल मीडियावरुन या गाण्याचा एक प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 

"तृप्ती डिमरी ही अभिनेत्री नसून नवीन मल्लिक शेरावत आणि सनी लिओनी आहे", असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. "तृप्तीसाठी वाईट वाटतंय. ती एक चांगली अभिनेत्री आहे. अॅनिमलमुळे लोकांना वाटतं की ती फक्त हेच करू शकते", अशी कमेंटही केली आहे. "तृप्ती डिमरी मल्लिका शेरावत का बनत आहे?" असंही एकाने म्हटलं आहे. 

दरम्यान, विकी कौशल आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असलेला 'बॅडन्यूज' सिनेमा येत्या १९ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील विकी कौशलचं तौबा तौबा गाणंही प्रचंड हिट ठरलं आहे. या गाण्यातील विकीच्या डान्सचं कौतुकही होत आहे.  

टॅग्स :तृप्ती डिमरीविकी कौशलसिनेमा