Join us
Daily Top 2Weekly Top 5

"खूप रडले, डोकं बधीर झालं...", Animal नंतर तृप्ती डिमरीची अशी झालेली अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:27 IST

Animal आधी 'कला', 'लैला मजनू' या सिनेमातही साकारली भूमिका, मात्र तृप्तीची चर्चा Animal मधील एका सीनमुळे जास्त झाली.

तृप्ती डिमरी (Tripti Dimri) Animal सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री. या सिनेमात तिने रणबीर कपूरसोबत न्यूड सीन दिला होता. तृप्तीने याआधी 'बुलबुल','लैला मजनू','कला' या सिनेमांमध्येही मुख्य भूमिका साकारली आहे. पण  Animal मधील न्यूड सीनमुळेच तिची सोशल मीडियावर जास्त चर्चा झाली. यानंतर तृप्तीसाठी प्रत्येक वेळी तशाच तऱ्हेच्या कमेंट्स यायला लागल्या. हे पाहून तृप्तीची काय अवस्था झाली होती हे तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

तृप्ती डिमरी सध्या 'भूल भूलैय्या 3' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत तृप्ती म्हणाली, "Animal नंतर मी खूप रडले होते. २-३ दिवस रडत होते. इतक्या टीकेची, नकारात्मकतेची सवयच नव्हती. या लेव्हलच्या टीकेचा सामना करावा लागेल असा विचार केला नव्हता. माझं डोकं खराब झालं होतं. लोक वाटेल ते लिहीत होते. मी माझ्या बहिणीशी बोलले तेव्हा ती म्हणाली की तुला माहितीये ना तू काय केलंय मग हे तुझंच आहे. तुला माहितीये तू आयुष्यात हे यश कसं मिळवलंय. याचा गर्व बाळग. यानंतर मी गोष्टी समजून घ्यायला लागले आणि सगळं बदललं."

ती पुढे म्हणाली, "कधी कधी मनसोक्त रडल्यानेही तुम्ही एखाद्या ट्रॉमामधून बाहेर येता. मला यानंतर खरोखरंच बरं वाटलं आणि मी नॉर्मल झाले. नंतर या टीकांचा माझ्यावर काहीही फरक पडला नाही. मी अभिनेत्री होणं हेच माझ्यासाठी मोठं अचिव्हमेंट होतं. अरे ही सुंदर दिसते एवढंच लोकांनी म्हणू नये तर माझ्या टॅलेंटविषयी बोलावं असं मला वाटायचं. आता ते होताना दिसतंय याचा मला आनंद आहे."

तृप्तीचा राजकुमार रावसोबतचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमा ११ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. तसंच दिवाळीच्या मुहुर्तावर तिचा 'भूलभूलैय्या ३' सुद्धा रिलीज होतोय. याशिवाय ती 'धडक २' सिनेमात सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे.

टॅग्स :तृप्ती डिमरीबॉलिवूडसोशल मीडियाट्रोल