Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशी सुरु झाली होती विजय वर्मा अन् तमन्ना भाटियाची लव्हस्टोरी! खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 08:57 IST

विजय आणि तमन्ना यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अभिनेता विजय वर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर देखील विजय आणि तमन्ना यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर दोघे देखील अनेक ठिकाणी एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कधी सुरू झाली, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यातच आता विजय वर्माने त्यांचं डेटिंग कधी सुरु झालं हे जाहीरपणे सांगून टाकलं आहे. 

नेटफ्लिक्स इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर नुकतेच तन्मय भट्टने विजय वर्माची मुलाखत घेतली. यावेळी खुद्द विजय वर्मानेच सांगितले की, 'लस्ट स्टोरीज 2' च्या शूटिंगदरम्यान आम्ही दोघांनी डेटिंगला सुरुवात केली नव्हती. आम्हाला रॅप अप पार्टी करायची होती आणि फक्त 4 लोक आले होते. मला असे वाटते की त्या दिवशी मी तिला मला तुझ्याबरोबर हँग आउट करायचं आहे, असं सांगितलं होतं की . त्यानंतर आमच्या पहिली डेट 20-25 दिवसांनी झाली होती'.

यापूर्वी तमन्ना ही फिल्म कॅम्पियनला दिलेल्या मुलाखतीतही नात्याबद्दल मोकळेपणाने बोलली होती. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली होती की, विजय आणि माझ्यातील बॉन्डिंग अगदी नैसर्गिक आहे. तो असा आहे ज्याची मला खूप काळजी वाटते. तसेच तो तिची हॅपी प्लेस असल्याचंही तिनं म्हटलं होतं. तमन्ना आणि विजय हे 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र दिसले होते.  शूटिंगच्या सेटवरही त्यांची भेट झाली.  'लस्ट स्टोरीज 2' सिनेमात दोघांनी इंटिमेट सीन दिले त्याचीही फारच चर्चा झाली होती. 

विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेता शेवटचा 'मर्डर मुबारक' सिनेमामध्ये दिसला होता. आता तो लवकरच मिर्झापूर ३, उल जलुल इश्क आणि मटका किंगमध्ये दिसणार आहे. तमन्ना हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सुपरस्टार रजनीकांत स्टारर ‘जेलर’ सिनेमात दिसली होती.तसेच तमन्नाकडे अरण्माई 4 आणि वेदा हे सिनेमे आहेत.  

टॅग्स :तमन्ना भाटियासेलिब्रिटीबॉलिवूड