Join us

फोटोत दिसणारी ही क्यूट मुलगी आज आहे बॉलिवूडची 'हिरोईन नंबर 1', डाय हार्ड फॅन्सच ओळखू शकतील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:24 IST

तरीही काही डाय हार्ड फॅन्सनी यातील अभिनेत्रीला ओळखलं. व्हायरल झालेल्या या फोटोत एक चिमुकली घराच्या बाल्कनीत आहे. तुम्ही ओळखलंत का हिला?

Bollywood : सोशल मीडियावर नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो शेअर करून फॅन्स त्यातील कलाकार ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो बघणं फॅन्सनाही आवडतं. असाच एक सेलिब्रिटीचा फोटो सोशल मीडियावर ट्रेन्ड करत आहे. पण यातील सेलिब्रिटीला ओळखणं मात्र सोपं काम नाही. तरीही काही डाय हार्ड फॅन्सनी यातील अभिनेत्रीला ओळखलं. व्हायरल झालेल्या या फोटोत एक चिमुकली घराच्या बाल्कनीत आहे. तुम्ही ओळखलंत का हिला?

जर तुम्ही या अभिनेत्रीला अजूनही ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ही मुलगी 90च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री राहिली आहे आणि तिची लहान बहिणही इंडस्ट्रीत लोकप्रिय अभिनेत्री आहे. आता इतकी हिंट देऊनही तुम्ही ओळखलं नसेल तर ही चिमुकली आहे करिश्मा कपूर.करिश्मा कपूरचा बालपणीचा फोटो करिना कपूरने शेअर केला होता. तिने करिश्माच्या वाढदिवसाला हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

करिश्मा कपूरचा बालपणीचा फोटो पाहून फॅन्स तिच्या क्यूटनेसच्या प्रेमात पडले आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे की, "माझी ऑल टाइम फेवरेट अॅक्ट्रेस". खरंच करिश्मा कपूरने 90च्या काळात धमाका केला होता. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे तिने दिले होते. इंडस्ट्रीतील जवळपास सर्वच सुपरस्टारसोबत तिने काम केलं. तेव्हाची सर्वात जास्त लोकप्रिय अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूरकडे पाहिलं जातं. सर्वच स्टारसोबतची तिची केमिस्ट्री लोकांना आवडली. आता ती सध्या रूपेरी पडद्यापासून दूर आहे. पण इव्हेंट्स, शोमध्ये ती दिसत असते.

टॅग्स :बॉलिवूडकरिश्मा कपूर