आयुषमान खुराना आणि सारा अली खान यांच्या बहुप्रतीक्षित 'पती पत्नी और वो २' या कॉमेडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट आधी ४ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र काही कारणास्तव निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नवी रिलीज डेट निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये आयुषमान खुराना एका बिबट्यासोबत जाळ्यात अडकलेला दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "शिकारी स्वतःच शिकार झाला! आता जाळ्यात अडकले आहेत आमचे प्रजापति पांडे. 'पती पत्नी और वो २' साठी तयार राहा, कारण हा चित्रपट आता १५ मे २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे."
तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आयुषमान खुराना आणि सारा अली खान यांच्यासोबतच रकुल प्रीत सिंह आणि वामिका गब्बी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या 'पती पत्नी और वो'चा सीक्वल आहे. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर ८६.८९ कोटींची कमाई करत चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे या सीक्वलकडून चाहत्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत.
प्रदर्शनाची तारीख का लांबणीवर पडली? चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याबाबत निर्मात्यांनी सांगितले की, त्यांनी एक दर्जेदार चित्रपट बनवला आहे आणि घाईघाईत चित्रपटाचे काम खराब करण्याची त्यांची इच्छा नाही. तांत्रिक कामे आणि इतर सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, जेणेकरून प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणतीही कमतरता राहू नये.
मुदस्सर अझीझ दिग्दर्शित हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना 'प्रजापति पांडे'च्या मजेशीर जगात घेऊन जाणार आहे. यात ड्रामा, कॉमेडी आणि रोमान्सचा जबरदस्त तडका पाहायला मिळेल. भूषण कुमार आणि रेणू रवी चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १५ मे २०२६ रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय धमाल करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Web Summary : Ayushmann Khurrana's 'Pati Patni Aur Woh 2' release is delayed until May 15, 2026. Citing quality concerns, producers moved the date. The film stars Sara Ali Khan, Rakul Preet Singh and Vamika Gabbi. The film promises comedy, drama, and romance.
Web Summary : आयुष्मान खुराना की 'पति पत्नी और वो 2' की रिलीज 15 मई 2026 तक स्थगित कर दी गई है। निर्माताओं ने गुणवत्ता संबंधी चिंताओं का हवाला देते हुए तारीख बदली। फिल्म में सारा अली खान, रकुल प्रीत सिंह और वामिका गब्बी हैं। फिल्म कॉमेडी, ड्रामा और रोमांस का वादा करती है।