२०२३ मध्ये आलेल्या वादग्रस्त आणि यशस्वी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली आहे. 'द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड' (The Kerala Story 2: Goes Beyond) या चित्रपटाचा दमदार टीझर आज प्रदर्शित करण्यात आला असून, याने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काय आहे टीझरमध्ये? टीझरची सुरुवात अतिशय गंभीर आणि खळबळजनक दृश्यांनी होते. "आमच्या मुली प्रेमात पडत नाहीत, तर जाळ्यात अडकतात. आता सहन करणार नाही... लढणार!" ही या चित्रपटाची मुख्य टॅगलाइन आहे. या टीझरमध्ये तीन तरुणींची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांचे धर्मांतराच्या माध्यमातून शोषण केले जाते. या तिघी त्यांचं भयानक वास्तव टीझरमधून समोर आणतात.
चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शनयावेळेस चित्रपटात नवीन कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्या भागाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले होते, तर या सीक्वलच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांनी सांभाळली आहे. निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी हा चित्रपट अधिक व्यापक आणि तीव्र असेल असे म्हटले आहे.
निर्मात्यांनी टीझरसोबतच प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. 'द केरळ स्टोरी २' हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द केरळ स्टोरी'ने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक कमाई केली होती. हा चित्रपट लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर आधारित असल्याने देशभर मोठा वाद निर्माण झाला होता. आता याच्या दुसऱ्या भागामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.
Web Summary : The 'Kerala Story 2: Goes Beyond' teaser is out, highlighting religious conversion and exploitation. Ulka Gupta, Aishwarya Ojha, and Aditi Bhatia star. Directed by Kamakhya Narayan Singh, it releases February 27, 2026, promising a more intense narrative on love jihad.
Web Summary : 'द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड' का टीज़र जारी, धर्मांतरण और शोषण पर प्रकाश डालता है। उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा और अदिति भाटिया अभिनीत। कामाख्या नारायण सिंह द्वारा निर्देशित, यह 27 फरवरी, 2026 को रिलीज होगी, जो लव जिहाद पर एक गहन कथा का वादा करती है।