Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोनच वर्षात मोडलं पहिलं लग्न, नंतर बॉयफ्रेंडचं कॅन्सरने निधन; एकटीच जग फिरतेय 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 15:25 IST

अभिनेत्रीचा एक्स पती हिंदी सिनेमातील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.

मनोरंजनसष्टीतील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री सध्या एकटीच आयुष्य जगतेय. अभिनेत्रीचा एक्स पती हिंदी सिनेमातील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.  70 ते 80 चा काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक वादळं आली. लग्नाच्या दोनच वर्षात संसार मोडला, नंतर बॉयफ्रेंडचं कॅन्सरने निधन झालं. तिच्या खऱ्या आयुष्यातील कहाणी नक्कीच दु:खद आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

'चश्मेबद्दूर', 'साथ साथ', 'अनकही', 'कमला' सारख्या सिनेमांमधून लोकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आहे दीप्ती नवल (Deepti Naval) . 3 फेब्रुवारी 1952 साली त्यांचा जन्म झाला. आज त्या ६२ वर्षांच्या असून एकट्याच जीवन जगत आहेत. 1985 साली दीप्ती नवल यांनी फिल्म दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांनी दिशा या मुलीला दत्तकही घेतलं. मात्र लग्नानंतर दोनच वर्षात त्यांचा संसार मोडला. तरी दोघांनी अधिकृत घटस्फोट 2002 साली म्हणजेच १५ वर्षांनंतर घेतला. 

प्रकाश झा यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर दीप्ती नवल यांच्या आयुष्यात विनोद पंडित आले. दीप्ती आणि विनोद दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते. 'थोडा सा आसमान' मालिकेत त्यांनी पती पत्नीची भूमिका साकारली होती. मात्र दीप्ती नवल यांच्या आयुष्यात विनोद यांची साथ फार काळ नव्हती. विनोद पंडित यांचं कॅन्सरने निधन झालं. विनोद यांच्या आयुष्यात आल्यानंतर दीप्ती यांचं पहिलं पेंटिंग प्रदर्शन झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्या विनोद यांना लकी चार्म मानायच्या. मात्र नशिबाने त्यांना वेगळं केलं.

दीप्ती नवल यांना पेंटिंग आणि फोटोग्राफीची आवडत होती. त्यांचे वडील आर्टिस्ट होते आणि दीप्तीनेही पेंटिग करावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र दीप्ती यांना अभिनयाची ओढ लागली. त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.

टॅग्स :दीप्ती नवलबॉलिवूडपरिवारसेलिब्रिटी