Join us

“सच का चेहरा देख लिया मैंने, सच की आवाज भी सुनली", नाना पाटेकर यांच्या ‘द कन्फेशन’चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 15:54 IST

The Confession Teaser : बऱ्याच वर्षांनी नाना हे हिंदी सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे हा सिनेमा काय असणार?त्यांची भूमिका कशी असणार याकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं आहे.

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) बऱ्याच वर्षांनी बॉलिवूड सिनेमात कमबॅक करत आहेत. ते आगामी ‘द कन्फेशन’ (The Confession Teaser) या सिनेमात दिसणार असून या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. नाना पाटेकर यांच्या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कारण बऱ्याच वर्षांनी नाना हे हिंदी सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे हा सिनेमा काय असणार?त्यांची भूमिका कशी असणार याकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागलं आहे.

नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ‘द कन्फेशन’ सिनेमाच्या टीझरमध्ये त्यांच्या भरदस्त आवाजात त्यांचा डायलॉग ऐकू येत आहे. सोबतच स्क्रीनवर कोर्ट दिसत आहे. त्यामुळे या सिनेमात काय असेल याचा अंदाज लोक आतापासूनच लावत आहेत. 

या टीझरच्या सुरुवातीला नाना पाटेकर “सच का चेहरा देख लिया मैंने, सच की आवाज भी सुनली, सच जानकर भी कुबूल नही मुझे, अगर जान भी जाए वो कुबूल है मुझे” असं बोलताना ऐकू येत. म्हणजे हा सिनेमा कोर्टरूम ड्रामा असणार असा अंदाज लोक लावत आहेत. 

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून नाना पाटेकर यांच्या या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘नाना पाटेकर लवकरच द कन्फेशन या चित्रपटात दिसणार आहेत. मोठ्या ब्रेकनंतर ते मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. ‘द कनफेशन’ चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन करणार आहेत.  

टॅग्स :नाना पाटेकरबॉलिवूड