Join us
Daily Top 2Weekly Top 5

'थँक यू फॉर कमिंग' घरबसल्या पाहायला मिळणार, कधी? कोणता प्लॅटफॉर्म? वाचा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:44 IST

चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल झाला आहे.

सध्या सगळीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मचा बोलबाला पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या 'थँक यू फॉर कमिंग' संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल झाला आहे.

 'थँक यू फॉर कमिंग' हा थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, आता ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नेटफ्लिक्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर करण्यात आली होती. दिग्दर्शक करण बुलानीच्या या सिनेमात चाहत्यांना भूमीचा जबरदस्त बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. 

 'थँक यू फॉर कमिंग' मध्ये भूमी पेडणेकर, शिबानी बेदी, डॉली सिंग, कुशा कपिला आणि शहनाज गिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता कपूर, अनिल कपूर आणि रिया कपूर यांनी केली आहे. अभिनेत्रींशिवाय अनिल कपूर आणि करण यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ''दम लगाके हैशा' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने 'रक्षाबंधन', 'पती पत्नी और वो', 'गोविंदा मेरा नाम', 'बधाई हो', 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.  बॉलिवूडमध्ये कोणाताही गॉडफादर नसताना भूमीने स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

टॅग्स :भूमी पेडणेकर नेटफ्लिक्सबॉलिवूडसिनेमा