Join us
Daily Top 2Weekly Top 5

जवान'मधील 'नॉट रमैय्या वस्तावैया' गाण्याचा टीझर रिलीज; शाहरुखने सिग्नेचर स्टेप करत जिंकली चाहत्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 17:10 IST

जवान सिनेमातील नॉट रमैय्या वस्तावैया या गाण्याच्या टीझर रिलीज झाला आहे.

किंग खान अर्थात अभिनेता शाहरुखचा ‘जवान’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्येच आता या सिनेमातील नॉट रमैय्या वस्तावैया या गाण्याच्या टीझर रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेमध्ये आता आणखीनच भर पडली आहे. इतकंच नाही तर प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये शाहरुखने पुन्हा एकदा त्याची सिग्नेचर स्टेप करत चाहत्यांची मनं जिंकली आहे.

#ASKSRK हे सेशन घेतल्यानंतर शाहरुखने स्वत: सोशल मीडियावर या गाण्याचा टीझर शेअर केला. “पहेले करूं छैय्या छैय्या रे, अब करू ताता थैया”, असे या गाण्याचे बोल असल्याचं टीझरमधून लक्षात येतं.  नॉट रमैय्या वस्तावैया या गाण्यापूर्वी या सिनेमातील जिंदा बंदा आणि चलेया ही गाणी प्रदर्शित झाली आहेत.

दरम्यान, जवानमध्ये शाहरुखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच या सिनेमात विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा,दीपिका पदुकोण देखील झळकणार आहेत. हा सिनेमा  7 सप्टेंबर रोजी तामिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुखच्या या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये किंग खानच्या जवानचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे.

टॅग्स :बॉलिवूडशाहरुख खानसिनेमा