नुकतीच IPL 2025 स्पर्धा पार पडली. या सीझनमध्ये फायनलला श्रेयस अय्यरच्या पंजाब किग्ज संघाचा, विराट कोहलीच्या RCB ने पराभव केला. पण या मॅचमुळे एका गायकाने तब्बल ३ कोटी रुपये गमावले आहेत. हा गायक म्हणजे करण औजला. २०२४ मध्ये तुफान व्हायरल झालेलं विकी कौशलचं 'तौबा तौबा' गाणं आठवतंय? हे गाणं करण औजलाने गायलं होतं. करणच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना कळाली असून सर्वत्र याचीच चर्चा आहे.
IPL च्या नादात करणने गमावले ३ कोटी
पंजाबी गायक आणि रॅपर करण औजलाने आयपीएल 2025 च्या फायनल मॅचमध्ये प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स संघावर ३.११ कोटींची (कॅनडियन डॉलर $500,000) मोठी पैज लावली होती. ही माहिती त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली होती. परंतु या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या पराभवामुळे करण औजलाने 3 कोटींहून अधिक रक्कम गमावली आहे. जर पंजाब किंग्स विजयी झाले असते, तर करणला जवळपास ६ कोटींचा फायझाला असता.
दुसरीकडे उलट परिस्थिती
करण औजलाचं तीन कोटींचं नुकसान झालं तर दुसरीकडे कॅनेडियन रॅपर ड्रेकने RCB संघावर तब्बल ११ कोटींची पैज लावली होती. फायनलमध्ये RCB ने बाजी मारल्याने रॅपर ड्रेकला मोठा फायदा झाला. त्यामुळे कुठे नुकसान तर कुठे फायदा अशी परिस्थिती पाहायला मिळाली. करण औजला मूळचा पंजाबमधील असून तो सध्या कॅनडामध्ये स्थायिक आहेत. 'बॅड न्यूज' सिनेमातील 'तौबा तौबा' गाण्याने करणला भरपूर लोकप्रियता मिळवून दिली.