Join us

VIDEO: "कोणीतरी मदत करा, माझ्याच घरी मला..."; तनुश्री दत्ताची रडून वाईट अवस्था, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:10 IST

Tanushree Dutta Crying Video: तनुश्री दत्ताचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. तनुश्रीच्या घरी असं काय घडलं की, तनुश्रीची रडून रडून वाईट अवस्था झाली? जाणून घ्या

तनुश्री दत्ता ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तनुश्रीने विविध सिनेमांमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तनुश्री दत्ताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत रडून रडून तनुश्रीची वाईट अवस्था झाली आहे. तनुश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती प्रचंड रडताना दिसत आहे. तनुश्रीची अक्षरशः रडून रडून वाईट अवस्था झाली आहे.  काय घडलं नेमकं?

तनुश्रीचा घरात होतोय छळ?

तनुश्रीने व्हिडीओ शेअर करुन सांगितलं की, "मित्रांनो, माझ्याच घरी माझा छळ होतोय. घरी मला त्रास दिला जातोय. मी आता पोलिसांना फोन केलाय. या त्रासाला कंटाळल्यानेच मला पोलिसांना फोन करावा लागला. त्यामुळे पोलीस घरी आले. पोलिसांनी मला पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं जेणेकरुन मी योग्य तक्रार नोंदवू शकेल. मी कदाचित उद्या पोलीस स्टेशनला जाईल. कारण माझी तब्येत आज ठीक नाही. मला इतका त्रास होतोय की गेल्या ४-५ वर्षांपासून माझी तब्येत खराब झाली आहे. मी कोणतंही काम करु शकत नाहीये." 

"माझ्या घरात पसारा झाला आहे. मी मोलकरणीलाही कामावर ठेवलं नाहीये. कारण याआधी माझा मोलकरणीसोबत वाईट अनुभव राहिला आहे. कारण अनेकदा त्यांनी चोरी करुन पळ काढला आहे. मला सगळं काम स्वतःलाच करावं लागतं. मी माझ्याच घरी संकटात सापडली आहे. प्लीज, माझी मदत करा. मी या छळाला कंटाळले आहे. २०१८ ला मी जो मी टूचा आरोप केला होता तेव्हापासून हे सुरु आहे. त्यामुळेच वैतागून मी आज पोलिसांना फोन लावला. जास्त उशीर होण्याआधी प्लीज, कोणीतरी माझी मदत करा."

काय आहे प्रकरण?

तनुश्रीने नंतरही एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात तिने सांगितलंय की, तिच्या घराच्या छपरावर मोठा आवाज कायम असतो. त्यामुळे तिला खूप त्रास होतोय. या आवाजापासून स्वतःला विचलित करण्यासाठी तनुश्री हिंदू मंत्रांचा आधार घेते. तनुश्रीने यासाठी बिल्डिंग मॅनेजमेंटकडे तक्रारही केली. परंतु काही उपयोग झाला नाही, असा खुलासा तिने केलाय

टॅग्स :तनुश्री दत्ताबॉलिवूडपरिवारछळ