Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वरा भास्कर-फहादच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली - 'हिंदू आणि मुस्लीम...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 17:02 IST

 लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने 16 फेब्रुवारी रोजी फहाद अहमदसोबत  कोर्ट मॅरेज केले होते. दोघांनी धर्माची भिंत पाडून लग्न केलं होतं. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे.  यानिमित्ताने स्वरा भास्कर-फहाद यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

स्वरा भास्करने पती फहादसोबतचे तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने कोर्ट मॅरेज आणि लग्नापूर्वीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. हे फोटो शेअर करण्यासोबतच तिनं लिहिलं, 'शहाणे लोक म्हणतात की फक्त मूर्खच घाई करतात...' फहाद आणि मी निश्चितपणे लग्नाची घाई केली, पण आम्ही लग्नापुर्वी तीन वर्षांपासून मित्र होतो. आमच्यात बरेच मतभेद होते. त्यामुळे आमच्यात प्रेमही फुलत आहे, हे आम्हाला दिसलं नाही'. 

स्वरा पुढे लिहिते, 'आम्ही हिंदू आणि मुस्लीम अशा दोन वेगवेगळ्या धर्माचे आहोत. मी फहादपेक्षा मोठी आहे आणि आम्ही दोघेही वेगवेगळ्या जगातून आलो आहोत. मी मोठ्या शहरातील मुलगी, जी इंग्रजी भाषिक कुटुंबातून येते आणि तो एक लहान शहरातील मुलगा, जो पारंपारिक पश्चिम यूपी कुटुंबातून येतो. जो उर्दू आणि भारतीय भाषा बोलतो. मी एक हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. तर तो एक रिसर्च स्कॉलर, कार्यकर्ता आणि राजकारणी आहे. पण, आम्हा दोघांमध्ये एक समान गोष्ट होती ती म्हणजे शिक्षण, ज्यामुळे आम्हाला प्रत्येक क्षेत्रात एक समान दृष्टीकोन मिळाला. मग भाषा, समाज किंवा देश असो. डिसेंबर 2019 मध्ये CAA-NRC आंदोलनादरम्यान आम्ही भेटलो. नंतर हळूहळू  जवळ आले आणि एकमेकांचे विश्वासू बनलो'.

स्वरा भास्करने लिहिले की, 'मला फहादसोबत सुरक्षित वाटलं आणि मी नेहमी त्याला भेटायची. दोघेही कशाचीही भीती न बाळगता बोलायचो. अनेक महिन्यांच्या संभाषणानंतर, मी फहादला विचारले की आता पुढे काय. तर तो म्हणाला की आपण एकमेकांपासून खूप वेगळे असूनही एकमेकांशी खूप सुसंगत आहोत. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि जर मी स्थिर होईपर्यंत वाट पाहिलीस तर आपण लग्न करु शकतो. मी शांत होते. पण, मला त्याच्या आत्मविश्वासावर विश्वास होता'.

स्वरा भास्करने पुढे लिहिले, 'मला नेहमी वाटायचे की लोक काय म्हणतील? मी जनतेच्या विरोधात निर्णय घेत आहे. कुटुंब, मित्र आणि माझे निष्ठावंत ट्रोल्स यावर काय प्रतिक्रिया देतील. याची मला काळजी वाटत होती. फहादने माझी ही भीती ओळखली आणि यावर आम्ही एकत्र काम केलं. आमच्या कुटुंबीय चितेंत होतं. पण आम्ही आमच्या प्रेमावर कायम राहिलो. अखेर कुटुंबीयांनाआमचा मोठा निर्णय स्वीकारला. जेव्हा ते आम्हाला एकत्र भेटले तेव्हा त्यांचा आमच्यावर विश्वास बसला'.

अभिनेत्री शेवटी लिहिते, 'एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आमचं लग्न झालं. संविधान टिकवण्याच्या विरोधात सुरू झालेला संबंध घटनात्मक तरतुदींनुसार पार पडला. एका महिन्यानंतर आम्ही माझ्या आजी-आजोबांच्या घरी रीतिरिवाजांसह कार्यक्रम पार पाडला.  संगीत, मेजवानी आणि दावत-ए-वलीमा असा 10 दिवसांचा हा आनंददायी कार्यक्रम म्हणजे एखाद्या सांस्कृतिक महोत्सवासारखे वाटला'.  स्वरा भास्करच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.  स्वरा सध्या पडद्यापासून दूर असून तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीने 23 सप्टेंबर 2023 रोजी एका मुलीला जन्म दिला. 

टॅग्स :स्वरा भास्करसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा