Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता कसा दिसतो 'मालगुडी डेज' मधील स्वामी, काय करतो काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 12:44 IST

प्रसिद्ध कथाकार आर.के.लक्ष्मण यांच्या 'मालगुडी डेज' या टीव्ही सीरिजने ८० आणि ९० च्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. जर तुम्हाला 'मालगुडी डेज' आठवत असेल तर त्यातील स्वामीही नक्कीच आठवत असेल.

प्रसिद्ध कथाकार आर.के.लक्ष्मण यांच्या 'मालगुडी डेज' या टीव्ही सीरिजने ८० आणि ९० च्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. जर तुम्हाला 'मालगुडी डेज' आठवत असेल तर त्यातील स्वामीही नक्कीच आठवत असेल. स्वामीची भूमिका करणाऱ्या या मुलाने त्यावेळी घराघरात ओळख मिळवली होती. प्रत्येक घरातील एक सदस्यासारखाच झाला होता. 

ज्यांनी 'मालगुडी डेज' पाहिली असेल ते स्वामीला कधीही विसरू शकणार नाहीत इतका त्याचा इम्पॅक्ट प्रेक्षकांवर आहे. स्वामी ही भूमिका जरी इतकी लोकप्रिय झाली असली तरी त्याची ही भूमिका कुणी साकारली होती असे विचारले तर बहुतेकांना या कलाकाराचं खरं नाव सांगता येणार नाही. त्यामुळेच आज आपण हा कलाकार काय करतो, कसा दिसतो हे जाणून घेणार आहोत. 

स्वामीची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव आहे मंजूनाथ नायकर असं आहे. या कलाकाराबाबत स्वत: आर.के.लक्ष्मण म्हणाले होते की, त्यांनी ज्या स्वामीची परिकल्पना केली होती, तो छोट्या पडद्यावर अवतरला आहे. 

मंजूनाथ नायकरने कमी वयातच यशाची सर्व शिखरे गाठली आहेत. पण ६८ कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी आणि काश्मिरी सिनेमात केल्यानंतरच केवळ १९ वर्षांचं वय असताना मंजूनाथने सिनेमातून सन्यास घेतला. त्यानंतर एक सामान्य व्यक्ती म्हणून तो जगू लागला. मंजूनाथ नायकर जितका मालगुडी डेजमधील स्वामीच्या भमिकेमुळे लोकप्रिय झाला तितकाच तो अमिताभ बच्चन यांच्या 'अग्निपथ' सिनेमामुळेही लोकप्रिय झाला. या सिनेमात त्याने अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. आजही ही भूमिका अनेकांच्या स्मरणात असेल. 

मैसूर विश्वविद्यालयातून इंग्रजीतून पदवी आणि समाजशास्त्रातून पदविका मिळवल्यानंतर मंजूनाथ एक पूर्णवेळ पब्लिक रिलेशन प्रोफेशनल झाला. नंतर त्याने सिनेमटोग्राफीमध्ये एक डिप्लोमाही मिळवला. आणि त्याने नंतर कधीही फिल्मी दुनियेकडे वळून पाहिले नाही. आता तो नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडोर इंटरप्रायजेससोबत काम करतो आणि बेंगळुरूच्या व्हिआयसी लि. मध्ये प्रिन्सिपल कन्सलटेन्ट म्हणूनही काम करतो आहे. 

पुढे स्वामीने स्वर्णरेखा नावाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि दोघांना एक ५ वर्षांचा मुलगाही आहे. महत्वाची बाब म्हणजे एक असाही माणूस आहे जो आपल्या बालपणी लोकप्रियतेच्या यशोशिखरावर पोहोचूनही त्या झगमगत्या दुनियेतून बाहेर आलाय. आज तो एक सामान्य जीवन जगत आहे.  

टॅग्स :बॉलिवूडटेलिव्हिजन