Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कधी साऱ्या जगासमोर व्यक्त केलं होतं प्रेम, जाणून घ्या मग कसं तुटलं अंकिता-सुशांतचं पवित्र नातं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 10:07 IST

१९ डिसेंबर १९८४ ला एका मराठी परिवारात जन्मलेली अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे शनिवारी म्हणजे १९ डिसेंबरला तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. अंकिता लोखंडेसाठी २०२० हे वर्ष फारच भावनिक चढ-उतार असणार राहिलं. याचवर्षी तिचा एक्स बॉयफ्रेन्ड आणि बॉलिवूडचा स्टार सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. ज्यानंतर अंकिता बरेच दिवस चर्चेत राहिली. काही आरोपही तिच्यावर झालेत ज्याचं समोर येऊन तिेने उत्तरही दिलं.

१९ डिसेंबर १९८४ ला एका मराठी परिवारात जन्मलेली अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी एकता कपूरची मालिका पवित्र रिश्तामध्ये सोबत काम केलं होतं आणि यादरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली. ही मालिका सुपरहिट ठरली होती. त्यानंतर अंकिता-सुशांत बराच वेळ सोबत घालवू लागले.

नंतर दोघे 'झलक दिखला जा'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सोबत दिसले होते. व्हॅलेंटाइन डे च्या खास एपिसोडमध्ये सुशांतने अंकिताला स्टेजवरच प्रपोज केलं होतं. सुशांतने अंकिताला पुढील सात जन्माची साथ मागितली होती. ज्यानंतर ज्युरीमध्ये बसलेल्या प्रियांका चोप्राने त्याला विचारले होते की, काय तू नॅशनल टीव्हीवर अंकिताला विचारले की, तू माझ्यासाठी लग्न करशील का? सुशांत यावर हो म्हणाला तर प्रियांकानेही अंकिताला यावर उत्तर मागितलं. यावर अंकितानेही सुशांतला लग्नासाठी होकार दिला होता.

का झालं दोघांचं ब्रेकअप?

हा एपिसोड आणि याचा सीक्वेन्स चांगलाच व्हायरल झाला होता. पण दोघांची प्रेमकथा फार काळ टिकू शकली नाही. काही वर्षातच सुशांत यशाची पायरी चढत गेला आणि दोघांमधील अंतर वाढत गेलं. एक दिवस असाही आला की, दोघे वेगळे झाले. दोघांचं वेगळं होण्याचं काही खास कारण नव्हतं. मीडिया रिपोर्ट्स आणि दोघांच्या मुलाखतीतून हे समोर आलं होतं की, सुशांत यशाच्या शिखरावर चढत होता आणि अंकिताला इन्सिक्युरिटी फील होत होती. 

अंकिताने एका मुलाखतीत सांगितले होते की, सुशांत आधीसारखा राहिला नव्हता. आता तो आधी ज्या लोकांसोबत राहत होता त्यांच्या टचमध्ये राहत नव्हता. त्याच्या वागण्यात बदल झाला होता आणि तो आधीसारखा फोन कॉलही करत नव्हता. दोघांच्या करिअरचे ट्रॅक वेगळे झाले होते आणि दोघांमध्ये कामामुळे अंतर वाढलं होतं. याच कारणाने दोघांचं ब्रेकअप  झालं. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतबॉलिवूडटेलिव्हिजन