Join us
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षांची चिमुकली बेपत्ता, सनी लिओनीशी आहे कनेक्शन; अभिनेत्री म्हणाली, 'माहिती देणाऱ्याला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 15:21 IST

अनुष्का मोरे ही ९ वर्षांची चिमुकली जोगेश्वरीमधून बेपत्ता झाली आहे.

अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तिने एका ९ वर्षीय मुलीचा फोटो पोस्ट करत ती चिमुकली गायब असल्याची माहिती दिली आहे. तसंच जे या मुलीचा थांगपत्ता शोधून आणेल त्याला स्वत: ५० हजार देण्याचंही तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण सनी लिओनी आणि त्या चिमुकलीचं कनेक्शन काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

अनुष्का मोरे ही ९ वर्षांची चिमुकली जोगेश्वरीमधून बेपत्ता झाली आहे. अभिनेत्री सनी लिओनीच्या घरी काम करणाऱ्या महिलेची ती लेक आहे. यामुळेच सनी लिओनी सुद्धा खूप काळजीत पडली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पोलिस आणि लोकांना आवाहन केलं आहे. जिथे कुठे ही मुलगी दिसेल संपर्क साधा अशी विनंती केली आहे. तसंच शोधून आणणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्यांना रोख रक्कम मिळेल असंही तिने नमूद केलं आहे. 

सनी लिओनी लिहिते,'या चिमुकलीला तिच्या कुटुंबापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी मी स्वत: ५० हजार देईन. मुंबईपोलिस आणि पालिकेला विनंती, ही अनुष्का माझ्या घरी काम करणाऱ्या महिलेची मुलगी आहे. अनुष्का काल ८ तारखेला संध्याकाळी ७ पासून जोगेश्वरीच्या बेहराम बागमधून बेपत्ता आहे. ती केवळ ९ वर्षांची आहे आणि तिला शोधण्यात तिचे आईवडील अक्षरश: हतबल झाले आहेत.तिच्याबद्दल कोणालाही माहिती असल्यास ११ हजार रोख देण्यात येतील.'

घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलीसाठी सनी लिओनीने उचललेलं हे पाऊल पाहून सर्वच तिचं कौतुक करत आहेत. सनी लिओनी माणूस म्हणून किती चांगली आहे याचं उत्तम उदाहरण हे असल्याची कमेंटही एकाने केली आहे. सध्या पोलिस अनुष्का मोरेचा तपास करत आहेत.

टॅग्स :सनी लिओनीबेपत्ता होणंपोलिसमुंबईगुन्हेगारी