Join us

सनी लिओनीने रिक्रिएट केला काजोल-शाहरुखचा सीन; साडी नेसून पतीसोबत खेळली बास्केट बॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:57 IST

Sunny leone: हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांना काजोल आणि शाहरुख खान या जोडीचीच आठवण झाली. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ चर्चेत येत असतात. यामध्येच सध्या सनीचा बास्केट बॉल खेळतानाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. यात सनी तिच्या नवऱ्यासोबत डेनिअल वेबरसोबत बास्केट बॉल खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी या दोघांनीही कुछ कुछ होता हैं चित्रपटातील सीन रिक्रिएट केल्याचं दिसून येत आहे. सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती डॅनिअलसोबत बास्केट बॉल खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने चक्क साडी नेसली आहे. सोबतच "कुछ कुछ होता है" चित्रपटातील "ये लडका हैं दिवाना" हे गाणं बॅकग्राऊंडला प्ले होत असल्याचं ऐकायला मिळत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांना काजोल आणि शाहरुख खान या जोडीचीच आठवण झाली. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोबतच "आपल्या बेस्ट फ्रेंडला टॅग करा'', असं कॅप्शनही सनीने या व्हिडीओला दिलं आहे.

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाशाहरुख खानकाजोल