Join us

मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:18 IST

कौशल कुटुंबात आपल्यापेक्षा लहान कोणीतरी आलं, सनीने व्यक्त केला आनंद

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी नुकतीच गुडन्यूज दिली. आज ७ नोव्हेंबर रोजी कतरिनाने मुलाला जन्म दिला. कौशल कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. कतरिना वयाच्या ४२ व्या वर्षी आई झाली असून विकी कौशल बाबा झाला आहे. विकीचा भाऊ अभिनेता सनी कौशलही पुतण्या झाल्याने जाम खूश आहे. त्याने सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे. 

सनी कौशल हा विकी कौशलचा लहान भाऊ आहे. विकी आणि कतरिना दोघंही आई वडील आणि सनी यांच्यासोबत जॉइंट फॅमिलीतच राहतात. आतापर्यंत घरात सनी कौशल लहान होता. पण आता त्याच्यापेक्षा लहान पाहुणा आला आहे. सनी काका झाला आहे. 'मै चाचा बन गया' असं म्हणत सनीने पोस्ट शेअर केली आहे. हे सांगताना त्याचा आनंद गगनात मावेना झाला आहे. वहिनी कतरिनासोबतही सनीचा छान बाँड आहे. कतरिनानेही अनेकदा सनीला 'लाडका दीर' म्हटलं आहे. 

कतरिना कैफ आणि विकी कौशलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परिणीता चोप्राने कतरिनाचं बेबी बॉय क्लबमध्ये स्वागत केलं आहे. करीना कपूर, दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, सोनम कपूर, कियारा अडवाणी यांनीही विकी-कतरिनाचं अभिनंदन केलं आहे. 

कतरिना आणि विकीने सप्टेंबर महिन्यात प्रेग्नंसीबद्दल अधिकृत घोषणा केली होती. तर आता त्यांच्या घरी चिमुकला पाहुणा आला आहे. २०२१ मध्ये विकी आणि कतरिनाने राजस्थान येथे लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर साडेतीन वर्षांनी त्यांना बाळ झालं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vicky Kaushal's brother Sunny becomes uncle as Katrina delivers baby!

Web Summary : Vicky Kaushal and Katrina Kaif welcomed a baby boy. Sunny Kaushal is overjoyed to be an uncle. He shared his excitement on social media. Celebrities congratulated the couple. They married in 2021 in Rajasthan.
टॅग्स :सनी कौशलकतरिना कैफबॉलिवूड