सनी देओलच्या (sunny deol) 'जाट' सिनेमा काल रिलीज झाला. 'जाट' सिनेमाची (jatt movie) रिलीजआधी खूप हवा होती. सिनेमाच्या टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. गदर २ नंतर सनी देओलचा 'जाट' सिनेमाही सुपरहिट होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु 'जाट' सिनेमाचा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट पाहता या सिनेमाची पहिल्या दिवसाची सुरुवात काहीशी निराशाजनक म्हणता येईल. जाणून घ्या
'जाट' सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई किती
Sacnilk च्या रिपोर्टनुसार 'जाट' सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त ९.५० कोटींची कमाई केली आहे. 'जाट' सिनेमाची सलमानच्या 'सिकंदर' सिनेमाशी तुलना केली तर, सिकंदरपेक्षा 'जाट'ची कमाई खूपच कमी आहे. 'जाट' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगलाही प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळाला. 'जाट' सिनेमाचं बजेट १०० कोटी इतकं आहे. परंतु पहिल्या दिवसाची कमाई बघता 'जाट' सिनेमाची सुरुवात निराशाजनक म्हणाली लागेल.
'जाट' सिनेमाविषयी
'जाट' सिनेमा हा ॲक्शन एंटरटेनर असून अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत आहे. सनीसोबत या चित्रपटात रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग, रेजिना कॅसांड्रा, सैयामी खेर आणि स्वरूपा घोष सारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. 'गदर २'नंतर सनी देओलचा 'जाट' सिनेमा सुपरहिट होईल, अशी चाहत्यांना आशा आहे. सनी देओलच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचं तर 'जाट' सिनेमानंतर सनी 'बॉर्डर २' आणि 'लाहोर १९४७' सिनेमात दिसणार आहे.