Join us

जेव्हा डायरेक्टरने फसवून Dharmendra सोबत शूट केला होता Adult सीन, सनी देओलने केली होती त्याची धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 11:12 IST

Dharmendra : एक दिवस सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एका सीनसाठी कांतिलाल शाहने धर्मेंद्रच्या छातीवर तेल लावून घोडेस्वारीचा सीन शूट केला होता. पण धर्मेंद्र यांना माहीत नव्हतं की, कांतिलाल शाह असं का करत आहेत. 

Dharmendra Movies : बॉलिवूडचे हिमॅन म्हटले जाणारे धर्मेंद्र यांचे त्यांच्या करिअर दरम्यानचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांची खाजगी आयुष्य तर खूपच चर्चेत होतं. सोबतच त्यांच्या प्रोफेशनलचेही अनेक किस्से आहेत. असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, हा किस्सा 'आज का गुंडा' सिनेमाशी संबंधित आहे.

या सिनेमात धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते आणि कांतिलाल शाह या सिनेमाचा डायरेक्टर होता. कांतिलाल शाह त्याकाळात बी-ग्रेड सिनेमे बनवण्यासाठी ओळखला जात होता. पण आज का गुंडा एक मसाला सिनेमा होता. एक दिवस सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एका सीनसाठी कांतिलाल शाहने धर्मेंद्रच्या छातीवर तेल लावून घोडेस्वारीचा सीन शूट केला होता. पण धर्मेंद्र यांना माहीत नव्हतं की, कांतिलाल शाह असं का करत आहेत. 

कांतिलाल शाहने केली होती चालाखी

शाहने धर्मेंद्र यांच्या बॉडी डबलसोबत एक रेपचा सीन शूट केला होता आणि तो सीन धर्मेंद्र यांच्या घोडेस्वारीच्या सीनसोबत मिक्स केला होता. हा सीन सिनेमात टाकला गेला होता. त्यानंतर सिनेमाच्या यूनिटमधील एका मेंबरने हे सनी देओलला सांगितलं. त्याने सांगितलं की, तुझे वडील तर एका अॅडल्ट सिनेमात काम करत आहेत. सनी यावर खूप संतापला आणि त्याने कांतिलाल शाह याला भेटण्यासाठी बोलवलं.

सनीला कांतिलाल शाहकडून हे जाणून घ्यायचं होतं की, तो त्याचे वडील धर्मेंद्रला अॅडल्ट सिनेमात कसा काय कास्ट करू शकतो. सनी इतका संतापला होता की, शाहला खूप काही ऐकवल्यावर त्याने शाहच्या कानशिलातही लगावली होती. सोबतच लीगल अॅक्शन घेण्याचं सांगून सिनेमाचं शूटींगही थांबवलं होतं. दुसरीकडे धर्मेंद्र याबाबत दु:खी होते की, त्यांनी कांतिलाल शाहवर विश्वास ठेवून चूक केली. त्यांच्या करिअरवर या सीनमुळे मोठा डाग लागला असता.

टॅग्स :धमेंद्रसनी देओलबॉलिवूड