सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला त्याचा आगामी चित्रपट 'लाहोर १९४७' अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, हा चित्रपट १३ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सनी देओल पुन्हा एकदा एका ऐतिहासिक आणि तितक्याच प्रभावी भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बॉलिवूडमधील तीन दिग्गज नावं एकत्र येत आहेत. आमिर खानने सिनेमाची निर्मिती केली आहे, तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या निमित्ताने सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांची जोडी 'घायल' आणि 'दामिनी' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र येत आहे. चित्रपटामध्ये सनी देओलसोबत प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत असून बऱ्याच काळानंतर ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. तसंच शबाना आझमी, अली फजल आणि अभिमन्यू सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सनी देओलचा मुलगा करण देओलही झळकणार आहे.
प्रिती झिंटा बऱ्याच वर्षांनी स्क्रीनवर दिसणार असल्याने तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. 'प्रिती इज बॅक','किती वर्षांनी प्रितीला बघणार, खूप आतुर आहोत','प्रिती आणि सनी देओलची जोडी..आता मजा येणार' अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
सिनेमाची कथा'लाहोर १९४७' हा चित्रपट फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित एका हृदयद्रावक कथेवर आधारित आहे. हा चित्रपट सुप्रसिद्ध नाटक 'जिस लाहोर नई देख्या, ओ जम्याई नई' यावर आधारित असल्याचं बोललं जात आहे.
Web Summary : Sunny Deol's 'Lahore 1947,' produced by Aamir Khan and directed by Rajkumar Santoshi, releases August 13, 2026. It stars Preity Zinta, marking their reunion after years. The film is based on partition.
Web Summary : सनी देओल की 'लाहौर 1947', जो आमिर खान द्वारा निर्मित और राजकुमार संतोषी द्वारा निर्देशित है, 13 अगस्त, 2026 को रिलीज होगी। इसमें प्रीति जिंटा हैं, जो वर्षों बाद वापसी कर रही हैं। फिल्म विभाजन पर आधारित है।