Join us
Daily Top 2Weekly Top 5

गदर अन् जवानला विसरा! कारण...सनी पाजी-आमिर खान घेऊन येताएत 'लाहोर 1947'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 13:48 IST

सनी आणि आमिर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.  

आमिर खान (Amir Khan) प्रोडक्शन्स अंतर्गत आगामी सिनेमा 'लाहोर 1947' (Lahore 1947) सिनेमाची घोषणा झाली आहे. या प्रोजेक्टसाठी आमिर खानसह राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) आणि सनी देओलही (Sunny Deol) काम करत आहेत. आमिर खान सिनेमाची निर्मिती करणार आहे तर राजकुमार संतोषी दिग्दर्शन करणार आहेत. सनी देओल सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. तिघेही दिग्गज कलाकार एकत्र येत हा भव्य सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. 

राजकुमार संतोषी यांनी सनी देओलसोबत 'घायल', 'घातक', 'दामिनी' सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. हा यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड पाहता त्यांचा पुढचा सिनेमाही सुपरहिट होईल यात शंका नाही. सनीने नुकताच 'गदर 2'मधून ५०० कोटींचा बिझनेस केला आहे. विशेष म्हणजे या सिनेमातून सनी आणि आमिर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.  त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे. आमिर खानच्या प्रोडक्शनकडून या सिनेमाची घोषणा करण्यात आली.

काय आहे 'लाहोर 1947' ची कहाणी 

सिनेमाची कथा नक्की काय असेल याबद्दल प्रोडक्शन कडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सिनेमाच्या टायटलवरुन हे स्पष्ट होतंय की याची कथा भारत आणि पाकिस्तानवर आधारित आहे. 

टॅग्स :सनी देओलआमिर खानसिनेमा