Join us

मधमाशीने घेतला जीव? संजय कपूर यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर, नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:14 IST

धक्कादायक! एका मधमाशीमुळे करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या मृत्यूचं खरं कारण ऐकून सर्वांना धक्का बसला आहे

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे (karishma kapoor) एक्स पती संजय कपूर (sunjay kapur) यांचं निधन झालं. संजय कपूर यांचं अकस्मात निधन झाल्याने सर्वांना धक्का बसला. संजय कपूर हे पोलो खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू ओढवला, अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु संजय कपूर यांच्या निधनाचं खरं कारण वेगळंच आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका मधमाशीमुळे संजय यांना त्यांचा प्राण गमवावा लागला. काय घडलं बघा

संजय कपूर यांचं निधन कसं झालं?

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, संजय कपूर यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि ती मधमाशी त्यांना चावली. मधमाशी चावल्याने संजय कपूर यांना श्वास घेण्यास अडचण झाली. याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. अशाप्रकारे संजय कपूर यांच्या निधनाचं खरं कारण समोर आलंय. त्यामुळे एका मधमाशीने संजय कपूर यांचा जीव घेतल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

करिश्मा कपूरचे एक्स पती

संजय कपूर यांनी २००३ साली अभिनेत्री करिष्मा कपूरशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगाही झाला. मात्र लग्नानंतर १३ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. करिष्माने त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. करिष्माशी घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी दुसरं लग्न केलं. 

संजय कपूर यांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेबद्दल ट्वीट करत लिहिले होते की, "अहमदाबादमध्ये एअर इंडियाचा दुर्दैवी अपघात झाला. या दुर्घटनेमुळे बाधित सर्व कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना कायम आहेत. देव त्यांना या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं शक्ती देवो." संजय यांच्या अकस्मात निधनाने सर्वांना धक्का बसला आहे.

टॅग्स :करिश्मा कपूरबॉलिवूडमृत्यूलंडन