अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा आजकाल अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. गोविंदाच्या अफेअरबद्दल सुनीता अनेकदा मीडियासमोर बोलली आहे. तसंच तिने गोविंदाकडून घटस्फोट मागितल्याचीही चर्चा होती. दोघंही वेगळे राहतात असंही बोललं गेलं होतं. आता पुन्हा एकदा सुनीता आहुजाची खळबळजनक मुलाखत व्हायरल झाली आहे. मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचं अफेअर आहे या चर्चांवर तिने प्रतिक्रिया दिली.
सुनीता आहुजाने पारस छाबडाच्या पॉडकास्टवर हजेरी लावली. यावेळी ती म्हणाली, "मी जोवर माझ्या डोळ्यांनी पाहत नाही आणि गोविंदाला रंगेहाथ पकडत नाही तोवर मी काहीही घोषित करु शकत नाही. गोविंदाचे अनेक अफेअर आहेत मी ऐकत आहे, कोणी मराठी अभिनेत्री आहे अमुक आहे तमूक आहे..मी एक सांगू का, हे सगळं करायचं हे वय नाही. आता गोविंदाने आपल्या मुलीला सेटल करण्याविषयी, मुलगा यशच्या करिअरविषयी विचार केला पाहिजे. पण अफवा तर मीही ऐकत आहे."
ती पुढे म्हणाली, "मी हजार वेळा सांगितलं आहे की जोवर मी तोंड उघडत नाही तोवर कशावरही विश्वास ठेवू नका. मी मीडियाला हेही सांगितलं आहे की मी जे बोलते ते खरं बोलते. खोटं कधीच बोलत नाही. मी बेधडक बोलते काहीही लपवत नाही. माझा नवरा असला तरी मी लपवत नाही. मी तोंडावर बोलते. मी स्वत: मीडियाला बोलवून हे सांगेन. गोविंदाने असं असं केलं आहे, खरं आहे की नाही? मी गोविंदाच्या चाहत्यांनाही हा प्रश्न विचारेन की गोविंदाने जे केलंय ते योग्य आहे? चाळीस वर्षांची पत्नी असली पाहिजे की आयुष्यात कोणी दुसरी असायला हवी. चाहते माझी बाजू घेतात की गोविंदाची ते मलाही पाहायचं आहे."