रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तसेच लोकांच्या मनावरही अधिराज्य गाजवत आहे. अक्षय खन्नापासून ते अर्जुन रामपालपर्यंत, रणवीर सिंगच्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला एक नवीन ओळख मिळाली आहे. याच यादीत कॉमेडियन सुनील ग्रोवरचे नाव जोडले जाणार होते, परंतु तो या उत्कृष्ट चित्रपटाचा भाग होता होता राहून गेला.
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमामध्ये प्रसिद्ध तसेच कमी लोकप्रियता असणाऱ्या कलाकारांना अगदी वेगळ्या अवतारात सादर केल्याबद्दल त्याचे कौतुक झाले आहे. हा एक रचनात्मक निर्णय होता, ज्याबद्दल कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सांगितले की, याचा उद्देश प्रेक्षकांना चकित करणे हा होता. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही या स्पाय थ्रिलरमध्ये रणवीर सिंगने साकारलेल्या गुप्तहेर हमजा अली मजारीच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. त्याचसोबत, यातील स्टार-स्टडेड सपोर्टिंग कास्टचेही कौतुक होत आहे, ज्यात आर माधवन भारतीय स्पायमास्टर अजय सान्याल, संजय दत्त एसपी चौधरी अस्लम, अक्षय खन्ना रहमान डकैत आणि अर्जुन रामपाल आयएसआय मेजर इक्बालच्या भूमिकेत आहेत.
''आम्ही कोणालाही सहजपणे कास्ट केलेले नाही''
कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्राने एका मुलाखतीत सांगितले की, ''मी नेहमी विचार करतो की लोकांना कसे चकित करावे आणि कास्टिंग अधिक मनोरंजक, मजेशीर आणि फ्रेश कसे करावे. मला या चित्रपटातून तेच करायचे होते. लोकांना या चित्रपटात ट्विस्टची अपेक्षा होती, म्हणून मला कास्टिंगमध्येही गोष्टींना ट्विस्ट करायचे होते. प्रत्येकाला वाटायला हवे की हे विचारपूर्वक केलेले काम आहे आणि आम्ही कोणालाही सहजपणे कास्ट केलेले नाही.''
या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंतीतो पुढे म्हणाला की, ''आम्ही डोंगा आणि आलमच्या भूमिकेसाठी खूप ऑडिशन्स घेतले आणि म्हणूनच या प्रक्रियेला १ ते १.५ वर्ष लागले, कारण तुम्हाला पाहावे लागते की परफॉर्मन्स कसा असेल, आणि यामुळे लोकांना कसे चकित करता येईल.'' मुकेशने सांगितले की, त्यांनी आलमच्या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला घेण्याचा विचार केला होता, पण शेवटी गेराला कास्ट करण्याचा निर्णय घेतला.
मुकेश छाब्राने सांगितले की, '''धुरंधर' हा एक असा चित्रपट आहे, ज्याचा त्यांना नेहमी अभिमान वाटेल आणि या चित्रपटासाठी त्यांना जे प्रेम आणि उत्साह मिळाला आहे, ते अतुलनीय आहे.'' तो म्हणाला, ''मी गेल्या एका वर्षात बरेच काम केले आहे, 'तेरे इश्क में', 'दिल्ली क्राइम', 'द फॅमिली मॅन ३', 'महारानी', आणि आणखी खूप काही. पण 'धुरंधर'साठी मला जे प्रेम मिळत आहे, ते अगदी तसंच आहे जसं मला 'गँग्स ऑफ वासेपुर', 'काई पो छे' आणि 'बजरंगी भाईजान'साठी मिळालं होतं.''
Web Summary : 'Dhurandhar's casting aimed to surprise. Sunil Grover was considered for a role, ultimately given to another comedian. The film's unique casting choices are celebrated.
Web Summary : 'धुरंधर' की कास्टिंग का उद्देश्य चौंकाना था। सुनील ग्रोवर एक भूमिका के लिए विचारे गए, जो अंततः एक अन्य हास्य कलाकार को दी गई। फिल्म के अद्वितीय कास्टिंग विकल्पों की सराहना की जाती है।