Join us

KL Rahul-Athiya Shetty Wedding : सुनील शेट्टीचा साधेपणा बघा ! फोटोग्राफर्सना मराठीत म्हणाला, 'बेटा उद्या मी मुलांना...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 15:30 IST

एकीकडे लेकीच्या लग्नाची गडबड तर दुसरीकडे सुनील शेट्टीचा साधेपणा बघून तुम्हीही त्याचं कौतुक कराल.

KL Rahul-Athiya Shetty Wedding : बॉलिवूड आणि क्रिकेटरची आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकत आहे. अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) लेक अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल (K L Rahul) यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. खंडाळा येथील एका फार्म हाऊसमध्ये हे लग्न थाटामाटात होणार आहे. सध्या दोघांच्या घरी लग्नाची लगबग दिसून येतेय. दरम्यान बॉलिवुडचा अण्णा सुनील शेट्टी खंडाळा येथील फार्महाऊसवर दाखल झाला. यावेळी त्याचा साधेपणा बघून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.

सध्या अथिया शेट्टी आणि के एल राहुलच्या लग्नाची लगबग सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर सुरु आहे. तर सर्व पापराझी, फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स हे फार्महाऊसच्या बाहेरच ठाण मांडून बसले आहेत. दरम्याने अचानक कारमधून सुनील शेट्टीची एंट्री झाली. तो स्वत: पापाराझींशी बोलण्यासाठी कारमधून उतरला. त्यांना म्हणाला, 'मी मुलांना उद्या घेऊन येईन हं. पापाराझींनी शुभेच्छा तो सर्वांचे आभार मानतो. तुम्ही जे प्रेम देत आहात त्यासाठी खूप धन्यवाद.'

दरम्यान एक फोटोग्राफर मराठीत प्रश्न विचारतो, 'अण्णा एक बोलायचं होतं . आम्हाला फोटो काढण्याची परवानगी मिळेल का?' इथून बाहेरुन काहीच दिसत नाही. यावर सुनील शेट्टी अगदी प्रेमाने मराठीतच समजावतो, 'बेटा आम्ही सर्व उद्या स्वत:हून समोर येणार गॅरंटी.' असं म्हणत तो पुन्हा गाडीत बसतो. 

२१ जानेवारीपासून हळद, संगीत आणि मेहंदी हे फंक्शन्स सुरु झाले आहेत. तर उद्या २३ जानेवारी रोजी हा विवाहसोहळा पार पडणार आहे.आथिया आणि राहुल गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. 

टॅग्स :लग्नबॉलिवूडअथिया शेट्टी सुनील शेट्टीलोकेश राहुल