Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुचित्रा पिल्लईनं चोरला होता प्रिती झिंटाचा बॉयफ्रेंड ? 'दिल चाहता है' फेम अभिनेत्रीनं इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 13:26 IST

अभिनेत्री सुचित्रा पिल्लई हिच्यावर एकेकाळी प्रिती झिंटाचा बॉयफ्रेंड चोरल्याचा ठपका होता.

चित्रपटसृष्टीत अनेकदा असं ऐकायला मिळतं की एखाद्या अभिनेत्रीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप होतं आणि त्यानंतर त्याचं नाव दुसऱ्या अभिनेत्रीसोबत जोडलं जाऊ लागतं. यामध्ये काही अफवा असतात, तर काही वास्तव असतं. अशावेळी दुसऱ्या अभिनेत्रींवर बॉयफ्रेंड चोरल्याचा आरोप लागतो.  असचं काहीसं घडलं होतं अभिनेत्री सुचित्रा पिल्लई हिच्यासोबत. सुचित्रा पिल्लईवर अभिनेत्री प्रिती झिंटाचा बॉयफ्रेंड चोरल्याचा आरोप केला जातो. इतक्या वर्षानंतर आता यावर अभिनेत्रीनं मौन सोडलं. 

प्रिती झिंटा हिनं जीन गुडइनफशी लग्न करण्यापूर्वी लार्स केल्डसेनला डेट केलं होतं. परंतु दोघांचं नात जास्त काळ टिकलं नाही. त्याच्या ब्रेकअपचं कारण अभिनेत्री सुचित्रा पिल्लई हिला मानलं जात होतं. तिला 'बॉयफ्रेंड स्नॅचर' असंही संबोधलं गेलं. प्रितीशी ब्रेकअप झाल्यानंतर लार्स केल्डसेन याने सुचित्रा पिल्लईशी लग्न केलं होतं. आता तिनं नुकतेच एका मुलाखतीत यावर स्पष्टीकरण दिलं.

सुचित्रा पिल्लई म्हणाली, 'प्रीती आणि मी कधीच मैत्रिणी नव्हतो.  कॉमन फ्रेंड असल्यामुळे आम्ही फक्त एकमेकांना ओळखत होतो. लार्स केजेल्डसेन प्रीती झिंटाला डेट केले होतं. परंतु त्यांच्या ब्रेकअपचे कारण मी नव्हते. मी त्यांच्यामध्ये आलेली नाही. ते दोघे वेगवेगळ्या कारणांमुळे वेगळे झाले'. यासोबतच सुचित्रानं 'बॉयफ्रेंड स्नॅचर' ही संकल्पना नाकारली.

 सुचित्रा पिल्लई हिनं 'दिल चाहता है'मध्ये सैफ अली खानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.  सुचित्रा  लवकरच 'ब्रोकन न्यूज 2' मध्ये जयदीप अहलावत आणि सोनाली बेंद्रेसोबत दिसणार आहे. सध्या ती 'ब्रोकन न्यूज 2 च्या' प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सुचित्रानं अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. सुचित्राने 2005 मध्ये प्रीती झिंटाचा एक्स बॉयफ्रेंड लार्सशी विवाह केला आणि त्यांना एक मुलगी देखील आहे. तर 2016 मध्ये प्रीतीने जीन गुडइनफशी लग्न केले आणि 2021 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई बनली आहे. 

टॅग्स :प्रीती झिंटासेलिब्रिटीबॉलिवूड