Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्त्री 2' आधीच 'स्त्री 3' बाबत अपडेट समोर; निर्माते म्हणाले, 'जास्त वाट पाहावी लागणार नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 16:52 IST

Stree 3: काल मुंबईत 'स्त्री 2'चा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. तेव्हा सिनेमाचे निर्माते दिनेश विजान म्हणाले...

हॉरर कॉमेडी सिनेमांमध्ये 2018 साली आलेल्या 'स्त्री'ने धुमाकूळ घातला होता. आता सहा वर्षांनंतर 'स्त्री 2' (Stree 2) रिलीज होतोय. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी यांची धमाल कॉमेडी आणि हॉरर सीन्स पाहताना मजा येणार आहे. स्त्री 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून चंदेरी गावावर 'सरकटे'ची दहशत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर स्त्री गावाची रक्षा करण्यासाठी येणार आहे. १५ ऑगस्टला स्त्री 2 रिलीज होतोय. मात्र त्याआधीच 'स्त्री 3' बाबतही अपडेट मिळालं आहे.

काल मुंबईत 'स्त्री 2'चा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. तेव्हा सिनेमाचे निर्माते दिनेश विजान म्हणाले, "सिनेमाच्या तिसऱ्या भागावरही काम सुरु झालं आहे. स्त्री 2 मॅडॉक फिल्म्सच्या सुपरनॅचरल युनिव्हर्सची जननी आहे. हा सिनेमा या युनिव्हर्ससंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. ट्रेलरमध्ये तर केवळ १० टक्केच दाखवण्यात आलं आहे. तसंच याच्या तिसऱ्या भागासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही."

मॅडॉक फिल्म्सच्या सुपरनॅचरल युनिव्हर्समध्ये आतापर्यंत 'स्त्री','भेडिया' आणि 'मुंज्या'ची निर्मिती झाली आहे. सर्वच फिल्म्सने आतापर्यंत बक्कळ कमाई केली. आता यांच्या पार्ट 2 मधून हे युनिव्हर्स जोडले जाणार आहे. स्त्री 2 पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. कमीत कमी ३० कोटी ओपनिंग होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूरराजकुमार रावअपारशक्ती खुरानापंकज त्रिपाठीबॉलिवूडसिनेमा